मुंबईचा पुण्यावर आठ गडी राखून विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 23:25 IST2016-05-01T23:17:46+5:302016-05-01T23:25:48+5:30

इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या पर्वात कर्णधार रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आठ गडी राखून विजय मिळविला.

Mumbai beat Pune by eight wickets | मुंबईचा पुण्यावर आठ गडी राखून विजय

मुंबईचा पुण्यावर आठ गडी राखून विजय

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 1- इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या पर्वात कर्णधार रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आठ गडी राखून विजय मिळविला. 
रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दिलेल्या  159 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघानं 18.3 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने 60 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 85 धावा कुटल्या. तर, पटेलनं 15 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा केल्या.  अंबाती रायडूनं 19 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 22 धावा काढून तंबूत परतला. बटलरनंही नाबाद 27 धावांची खेळी केली. 
सुरुवातीला मुंबई इंडियन्सनं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला उतरलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या होत्या. कर्णधार धोनीने 24 चेंडूंत 2 चौकार मारत 24 धावा केल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली तिवारीनं 45 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 57 धावा केल्या आहेत. तर स्मिथनं 23 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकार लगावत लक्षणीय अशा 45 धावा केल्या .  रहाणे 4, हँडस्कॉम्ब 6, पेरेरा*12, भाटिया* 3 धावा केल्या. 

Web Title: Mumbai beat Pune by eight wickets