शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीनिं’ची मुजोरी कायम

By admin | Updated: December 2, 2014 01:44 IST

निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आयपीएल फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आपला बचाव करताना त्यांच्याविरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आयपीएल फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आपला बचाव करताना त्यांच्याविरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात न्यायमूर्ती मुकुल मुद्गल समितीच्या अहवालावर सुनावणी करीत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये श्रीनिवासन यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, ‘‘श्रीनिवासन यांना जावई व चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन यांच्याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देण्याची गरज आहे.’’
मुद््गल समितीच्या अहवालामध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मयप्पनचा समावेश असल्याचा उल्लेख आहे. न्यायालयाने बीसीसीआयला आयपीएलच्या आर्थिक संकल्पनेची विस्तृत माहिती देण्यास बजाविले होते. न्यायालयाने बोर्डाला लीगमध्ये खेळाडूंची विक्री व फ्रॅ न्चायझीच्या कमाईबाबत विचारणा केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
श्रीनिवासन यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले की, ज्या वेळी मला जावई मयप्पनवरील आरोपांची माहिती मिळाली त्या वेळी मी ताबडतोब त्याच्याविरुद्ध कारवाई केली. बीसीसीआयने मयप्पन व राज कुंद्राविरुद्ध तक्रार दाखल केली.
पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयात श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोनदा आयपीएलचे जेतेपद पटकाविणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघावर कुणाचे नियंत्रण आहे? याची माहिती मागितली होती.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, श्रीनिवासन सीएसकेचे मालक असल्यामुळे स्पर्धा नि:पक्षपणे आयोजित करण्यास अडथळा निर्माण झाला असावा. सीएसकेवर ताबडतोब निलंबनाची कारवाई करण्यात यावी. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात उल्लेख असलेल्या व्यक्तींना वगळून बीसीसीआयची नव्याने निवडणूक घेण्यात यावी. बीसीसीआयची वार्षिक आमसभा १७ डिसेंबरला होणार असून, त्यात श्रीनिवासन यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)