शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
5
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
6
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
7
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
8
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
9
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
10
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
11
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
12
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
13
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
14
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
15
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
16
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
17
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
18
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
19
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
20
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मिसबाह, आफ्रिदीचा ‘वन-डे’ला अलविदा

By admin | Updated: March 21, 2015 01:09 IST

पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि अनुभवी शाहिद आफ्रिदी यांनी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

अ‍ॅडिलेड : शुक्रवारी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट््सनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि अनुभवी शाहिद आफ्रिदी यांनी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोन्ही खेळाडूंनी विश्वकप स्पर्धेपूर्वी वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. मिसबाह यापुढे कसोटी क्रिकेट खेळणार असून आफ्रिदी केवळ टी-२० क्रिकेट खेळणार आहे. ४० वर्षीय मिसबाहने १६२ वन-डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले, पण त्याला शतकी खेळी करता आली नाही. मिसबाहने २००१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वन-डे क्रिकेटमध्ये त्याने ५१२२ धावा फटकाविल्या आहेत. १९९६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या वन-डे मालिकेमध्ये केवळ ३७ चेंडूंमध्ये शतकी खेळी करीत चर्चेत आलेल्या आफ्रिदीमध्ये कुठल्याही गोलंदाजाविरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता होती. त्याने ३९८ वन-डे सामन्यांत ८०६४ धावा फटकावल्या आणि ३९५ विकेट घेतल्या. आफ्रिदीने २०११ च्या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यावेळी पाकिस्तान संघाला मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)३००३पाकिस्तान संघाच्या कर्णधार पदाच्या कार्यकाळात मिस्बाह-उल-हकने एकदिवसीय सामन्यात ३००३ धावांचा टप्पा पार केला. ३००० धावा पूर्ण करणारा मिस्बाह हा दुसरा पाकिस्तानी कर्णधार ठरला आहे. याआधी इम्रान खान याने कर्णधारपदाच्या कार्यकाळात ३२४७ धावा केल्या आहेत. जगातील १६ खेळांडूनी कर्णधारपद सांभाळताना ३०००च्या पुढे धावा केल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेदरम्यान फलंदाजांनी सातत्य दाखविले नाही. मधल्या टप्प्यात संघाला सावरणारा एकही फलंदाज नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामागे खराब फलंदाजी हे कारण आहेच, पण संपूर्ण स्पर्धेदरम्यानही आम्ही वर्चस्वपूर्ण खेळ करू शकलो नाही, हे खेदजनक आहे.- मिस्बाह उल हक, कर्णधार पाक