शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

इराणविरुद्धही ‘मेस्सी’लीला चालणार ?

By admin | Updated: June 21, 2014 00:48 IST

अर्जेटिना संघ फुटबॉल विश्वचषकात शनिवारी जेव्हा इराणविरुद्ध एफ गटाच्या लढतीत उतरेल, तेव्हा त्याचे लक्ष्य विजयाबरोबरच बाद फेरीतील आपले स्थान पक्के करण्याचे असेल.

बेलो होरिजोंटे : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा अर्जेटिना संघ फुटबॉल विश्वचषकात शनिवारी जेव्हा इराणविरुद्ध एफ गटाच्या लढतीत उतरेल, तेव्हा त्याचे लक्ष्य विजयाबरोबरच बाद फेरीतील आपले स्थान पक्के करण्याचे असेल.
अर्जेटिनाने त्याच्या पहिल्या सामन्यात बोस्निया-हर्जेगोविनाला 2-1 असे पराभूत केले होते. संघाने सामन्याच्या सुरुवातीलाच डिफेन्समध्ये पाच खेळाडू उतरवले होते आणि पुन्हा 4-3-3 अशा व्यूहरचनेने ते दिसले होते. त्यामुळे स्टार स्ट्राइकर मेस्सीला विश्वचषकामधील त्याचा पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती. इराणचे प्रशिक्षक कालरेस क्विरोज यांच्या मते, अर्जेटिनाला पराभूत करण्यासाठी त्याच्या संघाला चमत्काराची आवश्यकता असेल. तथापि, इराण अर्जेटिनाविरुद्ध आपल्या इतिहासापासून प्रेरणा घेऊ शकतो. 
रँकिंगमध्ये आशियाचा नंबर वन संघ इराणने आपल्या गत सामन्यात बलाढय़ नायजेरियाला गोलरहित ड्रॉवर रोखले होते आणि विश्वचषकाच्या इतिहासात संघाने प्रतिस्पध्र्याला गोल करू न देण्याची ही पहिलीच वेळ 
होती. तसेच इराणने 1978 नंतर चार विश्वचषकांमध्ये आपला सहावा गुण नोंदवला. जर अर्जेटिनाने हा सामना जिंकला तर तो सहा गुणांसह अव्वलस्थानी जाईल. इराणला विश्वचषकामध्ये एकमेव विजय 1998 मध्ये अमेरिकेविरुद्ध मिळाला होता; परंतु स्पर्धेत होणा:या खळबळजनक निकालापासून ते प्रेरणा घेऊ शकतात.  (वृत्तसंस्था)
 
डिएगो मॅराडोनानंतर र्अजेटिनाचा सर्वोत्तम खेळाडू मानला जाणारा मेस्सी विश्वचषक जिंकण्यास आतुर आहे. बार्सिलोनासाठी त्याचे शानदार विक्रम आहेत; परंतु या कामगिरीत तो विश्वचषकाचा ताजही 
जोडू इच्छित आहे. त्यामुळे त्याने इराणविरुद्ध आक्रमक खेळ करण्याची तयारी केली आहे. इराणचा अश्कान देजागाह व स्ट्राइकर रेज गुजानेजाद यांच्यासाठी फार कमी वाव आहे.