शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष हॉकी संघही ऑलिम्पिकमधून बाहेर

By admin | Updated: August 14, 2016 23:28 IST

महिलांपाठोपाठ भारतीय पुरुष हॉकी संघालाही ऑलिम्पिकमधून काढता पाय घ्यावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. 14 - महिलांपाठोपाठ भारतीय पुरुष हॉकी संघालाही ऑलिम्पिकमधून काढता पाय घ्यावा लागला आहे.  उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांना बेल्जियमकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला आहे.  भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा असतानाच ढिसाळ बचावाने सगळ्यांचाच भ्रमनिरास केला. गोल नोंदवून सुरुवात करणाऱ्या भारतीयांना विश्रांतीपर्यंत आघाडी टिकवली. पण चेंडूवर ताबा राखण्यात बेल्जियमने बाजी मारली होती. बेल्जियमच्या प्रतिआक्रमणाने भारतीय खेळाडू संभ्रमात पडले होते. त्यांनी सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या आणि त्यातील तीन संधी साधत भारतीयांच्या तमाम चाहत्यांचा हिरमोड केला. सामन्याच्या 33व्या मिनिटाला प्रथम डॉकिएर सेबॅस्टियन याने गोल केला. त्यानंतर 44व्या मिनिटाला त्यानेच बेल्जियमला आघाडीवर नेले आणि पाच मिनिटांनी बून टॉम याने विजय निश्‍चित करणारा गोल केला. श्रीजेशचा भक्कम बचाव देखील कामी आला नाही. बेल्जियमचा बचाव इतका अचूक होता की भारताला एकही कॉर्नर मिळवता आला नाही. मैदानी गोल करण्याच्या देखील केवळ चारच संधी त्यांना निर्माण करता आल्या. त्या उलट बेल्जियमने तीन कॉर्नर वाया दवडल्यानंतरही मैदानी गोल करून त्याची भरपाई केली. सानिया-बोपण्णाही हरले टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत पदक मिळविण्याच्या आशादेखील संपुष्टात आल्या. रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांना चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी ऱ्हाडेका आणि राडेक स्टेपानेक यांचा प्रतिकार करता न अाल्यानं त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे. वेगवान सर्व्हिस करणाऱ्या चेक जोडीने पहिलाच सेट 6-1 असा जिंकून भारतीय जोडीवर दडपण आणले. दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा-सानिया यांनी प्रतिकार केला खरा, पण ते प्रतिस्पर्ध्यांना रोखू शकले नाहीत. त्यांनी अखेरच्या क्षणी सर्व्हिस गमावली आणि चेक जोडीला सरळ सेटमध्ये विजय बहाल केला. चेक जोडीने अगदी सहज ही लढत 6-1, 7-5 अशी जिंकली.