शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

यशाचा मंत्र-कठोर मेहनत, चांगली संगत

By admin | Updated: December 11, 2015 00:04 IST

१४ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल याने कठोर मेहनत आणि चांगली संगत हे आपल्या जीवनातील प्रमुख सिद्धांत आहेत आणि त्या जोरावरच कारकिर्दीती उंची गाठण्यास मदत झाल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : १४ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल याने कठोर मेहनत आणि चांगली संगत हे आपल्या जीवनातील प्रमुख सिद्धांत आहेत आणि त्या जोरावरच कारकिर्दीती उंची गाठण्यास मदत झाल्याचे सांगितले.३० वर्षीय नदाल म्हणाला, ‘‘मी जेव्हा लहान होतो तेव्हा इतर मुलांप्रमाणेच मीही रोलँ गॅरो, विम्बल्डन आणि अन्य प्रोफेशनल स्पर्धा खेळण्याचे स्वप्न पाहत होतो. हे स्वप्न साकारण्यासाठी माझी जिद्द आणि प्रेरणाच ही माझ्या यशाची किल्ली आहे. मी स्वप्न साकारण्यासठी कठोर मेहनत घेतली आणि मी जेव्हा हे करू शकतो, तर मुलेदेखील ते करू शकतात.’’आयपीटीएल लढतीआधी तो म्हणाला, ‘‘मेहनतीबरोबरच चांगल्या लोकांची साथदेखील खूप आवश्यक आहे आणि मी त्या बाबतीत सुदैवी आहे. माझे प्रशिक्षक आणि अंकल टोनी यांच्या रूपाने मला मार्गदर्शक मिळाले. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते. मी अशा लोकांना बरोबर ठेवण्याचा सल्ला देईन, जे आपला खेळ समजू शकतील आणि लक्ष्य गाठण्यासाठी मदत करतील.’’नदालसाठी हे सत्र चांगले ठरले नाही आणि गेल्या एका दशकात एकही गँ्रडस्लॅम त्याला जिंकता आली नाही, असे प्रथमच घडले.टेनिसप्रेमींसाठी येणारा शनिवार खास असेल. या दिवशी दिल्लीत जगातील पाचवा मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर इंटरनॅशनल प्रिमीयर टेनिस लीग लढतीत आमनेसामने उभे ठाकतील.या लढतीविषयी नदाल म्हणाला, ‘‘रॉजर फेडररसोबत अनेक वर्षांपासूनची माझी ‘दुश्मनी’ विशेष ठरली आहे आणि आता आमच्या दोघांत अजून लढती खेळवल्या जातील, अशी आशा आहे. जेव्हा आम्ही दोघे आपसात खेळू, तेव्हा भारतातील क्रीडाप्रेमींसाठी एक सुरेख दृश्य असेल. या सामन्यासाठी मी विशेष उत्साही आहे.’’ (वृत्तसंस्था)