भारत- पाक मालिकेसाठी मनोहर यांचा पुढाकार

By Admin | Updated: October 16, 2015 00:02 IST2015-10-16T00:02:35+5:302015-10-16T00:02:35+5:30

भारत-पाकदरम्यान प्रस्तावित द्विपक्ष़ीय मालिकेच्या आयोजनावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आमंत्रण दिल्याची माहिती पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली

Manohar's initiative for Indo-Pak series | भारत- पाक मालिकेसाठी मनोहर यांचा पुढाकार

भारत- पाक मालिकेसाठी मनोहर यांचा पुढाकार

कराची : भारत-पाकदरम्यान प्रस्तावित द्विपक्ष़ीय मालिकेच्या आयोजनावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आमंत्रण दिल्याची माहिती पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली. उभय देशांमधील राजकीय संबंधांवर या मालिकेचे भवितव्य विसंबून आहे.
दुबईत झालेल्या आयसीसी कार्यसमितीच्या बैठकीत मनोहर सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याचे सांगून लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना शहरयार म्हणाले, की आयसीसी बैठकीत मनोहर यांच्याशी भेट न झाल्याने मी त्यांची फोनवर विचारणा केली. त्यावर मनोहर यांनी मला बीसीसीआय कार्यसमितीच्या बैठकीनंतर बोलण्यासाठी भारतभेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. मालिकेचे भविष्य पुढील दहा दिवसांत निश्चित होण्याची आशा आहे.
दौऱ्याबाबत पुढील दहा किंवा बारा दिवसात कळवावे, अशी विनंती बीसीसीआय अधिकाऱ्यांना केल्याचे सांगून शहरयार म्हणाले, की नवे अध्यक्ष मनोहर यांनी भारत-पाक मालिका सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Manohar's initiative for Indo-Pak series