मल्ल सुशीलकुमारची मोदींना हाक

By Admin | Updated: May 14, 2016 01:52 IST2016-05-14T01:52:23+5:302016-05-14T01:52:23+5:30

दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार तसेच देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून देणारा नरसिंग यादव यांच्यात ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घ्यायची की नाही याबद्दलचा वाद

Mallika calls Sushilkumar Modi | मल्ल सुशीलकुमारची मोदींना हाक

मल्ल सुशीलकुमारची मोदींना हाक

नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार तसेच देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून देणारा नरसिंग यादव यांच्यात ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घ्यायची की नाही याबद्दलचा वाद थेट पंतप्रधानांच्या दारात पोहोचला आहे. सुशीलने याबाबत पंतप्रधानांना विनंती पत्र लिहिले.
सुशीलने नरसिंगसोबत चाचणी घेण्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, भारतीय आॅलिम्पिक संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहिले. नरसिंगसोबत माझी चाचणी घ्या. यात जो जिंकेल त्याला पाठविण्याची विनंती सुशीलने या पत्रात केली.
यासंदर्भात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यांनी एका वाहिनीला दिलेले वक्तव्य फारच मजेदार आहे. ते म्हणतात, ‘हे प्रकरण लवकर संपणारे नाही. पंतप्रधानांपर्यंत ते जाऊ शकते. अशी स्थिती आल्यास देशहिताचा निर्णय घ्यावा लागेल. याशिवाय त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्या मल्लाने पात्रता गाठली तोच आॅलिम्पिकसाठी जाईल.’
दरम्यान, सुशीलचे गुरू सतपाल म्हणाले, ‘आमची एकच मागणी आहे की दोन्ही मल्लांमध्ये चाचणी घ्या. चाचणी घेण्यात वाईट काहीच नाही. जो जिंकेल तो आॅलिम्पिकमध्ये आणखी सरस कामगिरी करेल. या प्रकरणी सर्वांना विनंती करू तसेच चाचणी घेण्यास सांगू. ’
सुशील आणि सतपाल हे यासंदर्भात क्रीडामंत्री सोनोवाल यांची देखील भेट घेणार आहेत. सोनोवाल यांनी कालच सुशील-नरसिंग वादात क्रीडा मंत्रालय दखल देणार नाही, असे स्पष्ट केले होते. कुस्ती महासंघाने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला रिओ आॅलिम्पिकसाठी मल्लांची जी यादी पाठविली त्यात ७४ किलो वजन प्रकारात सुशीलच्या नावाचा समावेश नव्हता. बृजभूषण यांच्या वक्तव्यानंतर सुशीलसाठी आॅलिम्पिकचे रस्ते बंद झाल्याचे मानले जात आहे. पण सुशील अद्याप आशावादी आहे. त्याने थेट पंतप्रधानांनाच हस्तक्षेप करण्याची गळ घातली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Mallika calls Sushilkumar Modi