शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसामुळे रब्बी हंगामावर परिणाम कककक आणेवारीकडे नजरा : सोयाबीनचा उतारा निम्म्यावऱ़़

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकूण २८ हजार ५०० हेक्टर्स लावगडीयोग्य जमीन असून, त्यापैकी १७ हजार ६५६ हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या राशीवर अनेक संसारिक गणिते घातली होती़ परंतु, सुरुवातीला पावसाने आणि आता रोगाने सोयाबीन पुर्णता: करपले आहे़ त्यात पावसाने पुन्हा दडी मारली आहे़ दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आल्याने अनेकजण राशीसुद्धा करीत आहेत़ राशी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरी घोर निराशाच पडत आहे़ कारण काळ्या कसदार जमिनीतील सोयाबीनसुद्धा एकरी चार पोतेच निघत आहे़ माळरान जमिनीतील सोयाबीच्या राशी करण्याचासुद्धा खर्च निघत नाही़ लागवड खर्च तर दुरच राहिला़
पावसाने मोठा ताण दिल्याने ऐन बहरात सोयाबीनची वाढ खुंटली़ त्यातच रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला़ परिणामी सोयाबीन, ज्वारीच्या आकाराचे बनल्याने उतारा निम्याने घटला आहे़ त्याचबरोबर सोयाबीन आहे की ज्वारी आहे हेच प्रथमदर्शनी समजत नाही़
सोयाबीन काढण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धावपळ सुरु झाली आहे़ परंतु, सध्या निवडणुका सुरु असल्याने मजूर कार्यकर्ते झाले आहेत़ त्यामुळे शेतकरी चोहीकडून त्रस्त झाले आहेत़