कांगारू भिडणार टीम इंडियाशी

By Admin | Updated: March 21, 2015 02:26 IST2015-03-21T02:26:27+5:302015-03-21T02:26:27+5:30

ज्यांनी वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला सळो की पळो करून सोडले होते, त्याच कांगारूंना आता टीम इंडियाशी सेमीफायनलमध्ये भिडावे लागणार आहे.

Kangaroo team up with India | कांगारू भिडणार टीम इंडियाशी

कांगारू भिडणार टीम इंडियाशी

ज्यांनी वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला सळो की पळो करून सोडले होते, त्याच कांगारूंना आता टीम इंडियाशी सेमीफायनलमध्ये भिडावे लागणार आहे. क्वॉर्टर फायनलमध्ये पाकिस्तानला जेरीस आणून आॅस्ट्रेलिया ६ विकेट्स राखून जिंकला अन् पाकला सेमीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला.

पाकचा हा ‘मौका’ गेला
सोप्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या आॅस्ट्रेलियाचे तीन गडी स्वस्तात तंबूत धाडल्यानंतर वॉटसनचा सोपा झेल राहत अलीने सोडला आणि पाकचा सेमीचा ‘मौका’ गेला.

वचपा काढणार?
डिसेंबर २०१४ पासून आॅस्टे्रलियामध्ये खेळत असलेल्या भारताला एकही विजय मिळवता आला नव्हता. याचाच ‘वचपा’ टीम इंडिया काढणार की नाही, याची उत्सुकता आहे.

Web Title: Kangaroo team up with India