शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ज्यू. महिला फुटबॉल : महाराष्ट्राची दणदणीत विजयी सलामी

By admin | Updated: July 4, 2016 21:35 IST

भाग्यश्री दळवीने झळकावलेल्या धमाकेदार ५ गोलच्या जोरावर महाराष्ट्राने दणदणीत विजयी सलामी देताना आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत छत्तीसगडचा ८-० असा फडशा पाडला

ज्यू. महिला फुटबॉल : भाग्यश्रीने नोंदवले ५ गोल; छत्तीसगडचा ८-० ने उडवला धुव्वामुंबई : भाग्यश्री दळवीने झळकावलेल्या धमाकेदार ५ गोलच्या जोरावर महाराष्ट्राने दणदणीत विजयी सलामी देताना आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) राष्ट्रीय ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धेत छत्तीसगडचा ८-० असा फडशा पाडला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने तुफान हल्ला चढवताना छत्तीसगडच्या आव्हानातली हवाच काढली.कटक (ओडिसा) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भाग्यश्रीने कमालीचा आक्रमक खेळ करताना महाराष्ट्राकडून निर्णयाक खेळ केला. तीने ५ गोल झळकावताना अन्य तीन गोलमध्ये निर्णायक भूमिका बजावताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला. भारताची माजी ज्युनियर कर्णधार करेन पैस हिने देखील २ गोल करताना महाराष्ट्राच्या विजयात योगदान दिले. तर ट्रीसिया कोलॅकोने एक गोल नोंदवला. सावध सुरुवात केलेल्या महाराष्ट्राने हळूहळू आक्रमक पवित्रा घेत छत्तीसगडला दबावाखाली आणले. भाग्यश्रीने पहिला गोल करुन महाराष्ट्राचे खाते उघडल्यानंतर ४२व्या मिनिटाला करेनने गोल करुन मध्यंतराला महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. विश्रांतीनंतर मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जबरदस्त आक्रमण करताना छत्तीसगडच्या क्षेत्रात जोरदार हल्ले केले. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने ६ गोलचा धडाका केल्यानंतर छत्तीसगडने पराभव टाळण्याचे प्रयत्नही सोडले.