शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ज्यु. हॉकी विश्वचषकाची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: November 7, 2016 00:04 IST

पुढील महिन्यात ८ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

लखनौ : पुढील महिन्यात ८ ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.आशिया चॅम्पियन भारतीय संघ येथे २२ नोव्हेंबरला पोहोचणार आहे. येथील एका क्रीडा महाविद्यालयात संघ सराव करणार आहे. त्यानंतर भारत ‘अ’ व भारत ‘ब’ दरम्यान एक प्रदर्शनीय सामना होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह अन्य चार संघ ४ डिसेंबरला पोहोचणार आहेत. गतविजेता जर्मनीही ४ डिसेंबरला पोहोचणार असून, त्यांचा पहिल्याच दिवशी स्पेनशी सामना होणार आहे.स्पर्धेत सहभागी होणारे सर्व १६ संघ पाच डिसेंबरपर्यंत येथे पोहोचणार आहेत. विश्वचषक स्पर्धेचे प्रायोजक उत्तर प्रदेश सरकार ध्यानचंद स्टेडियममध्ये गुरूगोविंदसिंग अ‍ॅस्ट्रोटर्फचे काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण करणार आहेत. अकरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सुमारे ५०० खेळाडू, अधिकारी व सहयोगी कर्मचाऱ्यांसाठी सर्व हॉटेल बुक करण्यात आली आहेत.या स्पर्धेत भारतासह आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना, आॅस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, जपान, कोरिया, हॉलंड, इजिप्त, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व स्पेनच सहभागी आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सुमारे १०० हून अधिक देशांत करण्यात येणार आहे. स्पर्धेत भारताच्या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व कॅनडाचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)स्पर्धेतील भारताचे सामने असे भारत- कॅनडा : ८ डिसेंबरभारत- इंग्लंड : १० डिसेंबरभारत-द. आफ्रिका : १२ डिसेंबरउपांत्य व अंतिम सामना १८ डिसेंबरक्रीडामंत्र्यांकडून हॉकी संघाचे अभिनंदननवी दिल्ली : सिंगापूर येथे आशियाई स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी अभिनंदन केले आहे.गोयल यांनी संघाचे कौतुक करताना म्हटले आहे, ‘नुकतेच पुरुषांच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करीत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर महिला संघाचा विजय साजरा करण्याची वेळ आली आहे. दोन्ही संघांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या यशामागे कठोर परिश्रम व शिस्त आहे.’ यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही महिला संघाचे अभिनंदन केले आहे.