जयराम, प्रणीत दुसऱ्या फेरीत

By Admin | Updated: September 29, 2016 04:25 IST2016-09-29T04:25:23+5:302016-09-29T04:25:23+5:30

भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि बी. साई प्रणीत यांनी आज येथे कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. तथापि, के. श्रीकांत,

Jayaram, Praneeth in second round | जयराम, प्रणीत दुसऱ्या फेरीत

जयराम, प्रणीत दुसऱ्या फेरीत

सोल : भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि बी. साई प्रणीत यांनी आज येथे कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. तथापि, के. श्रीकांत, 
पी. कश्यप, एच. एस. प्रणय आणि तन्वी लाड यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आज २९ वर्षांचा झालेल्या जयरामने कोरियाच्या जियोन हिकोक जीन याचा ४५ मिनिटांत २३-२१, २१-१८ असा पराभव केला. मुंबईच्या या खेळाडूची पुढील फेरीत गाठ पडणार आहे ती चीनचा हुआंग युशियांग याच्याशी.
प्रणीतने एका तासापेक्षा जास्त चाललेल्या लढतीत चिनी-तैपेईचा सुन जेन हाओ याचा २१-१३, १२-२१, २१-१५ असा पराभव केला. पुढील फेरीत तो कोरियाच्या सहाव्या मानांकित सोन वॉन याच्याशी दोन हात करील.
तथापि, रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या आठव्या मानांकित श्रीकांतला हाँगकाँच्या वोंग विंगच्या व्हिन्सेंटविरुद्ध १०-२१, २४-२२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. कश्यपलादेखील चौथ्या मानांकित टियान होवेईविरुद्ध २२-२०, १०-२१, १३-२१ अशी पराभवाची चव चाखावी लागली. टियान आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील उपविजेता आहे.
स्विस ओपन चॅम्पियन प्रणयला चिनी-तैपेईच्या वांग जू वेईविरुद्ध पहिल्या फेरीत २३-२१, १७-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव खेळाडू तन्वी लाड हिला डेन्मार्कच्या अ‍ॅना थिया मेडसनविरुद्ध १८-२१, २१-१३, १८-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)

Web Title: Jayaram, Praneeth in second round