शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

इव्हानोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 1, 2015 01:47 IST

अ‍ॅना इव्हानोव्हिचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी संघर्षपूर्ण लढतीत रशियाच्या एकाटेरिना मकारोव्हाचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

पॅरिस : अ‍ॅना इव्हानोव्हिचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी संघर्षपूर्ण लढतीत रशियाच्या एकाटेरिना मकारोव्हाचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. २००८ मध्ये येथे जेतेपद पटकावल्यानंतर इव्हानोव्हिचला प्रथमच महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यात यश आले.२००८ मध्ये जेतेपद पटकावणारी सातवे मानांकनप्राप्त सर्बियन टेनिसपटू इव्हानोव्हिचने नववे मानांकनप्राप्त रशियाच्या मकारोव्हाची झुंज ७-५, ३-६, ६-१ ने मोडून काढली. इव्हानोव्हिचने कारकीर्दीत आठव्यांदा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अंतिम ८ खेळाडूंत स्थान मिळवले. इव्हानोव्हिचला उपांत्यपूर्व फेरीत एलिना स्वितोलिनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्वितोलिना फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारी युक्रेनची पहिली टेनिसपटू ठरली. इव्हानोव्हिचने पावसाच्या व्यत्ययामुळे अडीच तासांच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरू झालेल्या लढतीत विजयाला गवसणी घातली. पॅरिसमध्ये चौथ्या फेरीत खेळताना इव्हानोव्हिचने तिसऱ्यांदा निर्णायक सेटमध्ये विजय मिळवला. हा सामना बघण्यासाठी जर्मनीच्या विश्वकप विजेता संघातील फुटबॉलपटू बास्टियन श्वेनस्टाइगर प्रेक्षकांमध्ये उपस्थित होता. (वृत्तसंस्था)जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विलियम्सने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाविरुद्ध ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत नववा विजय मिळविताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फ्रेंच ओपन स्पर्धेत शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या हायव्होल्टेज लढतीत अव्वल मानांकित सेरेनाने तिसऱ्या फेरीच्या लढतीत २७ व्या मानांकित अजारेंकाची झुंज ३-६, ६-४, ६-२ ने मोडून काढली. सेरेनाची ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अजारेंकाविरुद्धची कामगिरी ९-० अशी झाली आहे, तर एकूण १६-३ अशी आहे. अजारेंकाला केवळ तीनवेळा सेरेनाविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले आहे. ३३ वर्षीय सेरेनाने पहिला सेट ३-६ने गमाविल्यानंतर शानदार पुनरागमन केले. अजारेंकाला मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. सेरेनाने या लढतीत एकूण ८८ गुण वसूल केले, तर तिच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान असलेल्या अजारेंकाला ७९ गुण वसूल करता आले. १९ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळविणाऱ्या सेरेनाने या सामन्यात सहा दुहेरी चुका केल्या आणि ४१ विनर्स लगावले. सेरेनाला पुढच्या फेरीत मायदेशातील सहकारी स्लोएन स्टिफन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्टिफन्सने बुल्गारियाच्या स्वेत्लाना पिरोनकोव्हाचा पराभव केला. महिला एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या अन्य सामन्यांत १७ व्या मानांकित इटलीच्या सारा इराणीने दहावे मानांकन प्राप्त जर्मनीच्या आंद्रिया पेटकोव्हिकचा ६-३, ६-३ ने पराभव केला.इराणीला पुढच्या फेरीत जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जिसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जॉर्जिसने अमेरिकेच्या इरिना फाल्कोनीचा ६-४, ६-१ ने पराभव केला. १६ वे मानांकन प्राप्त अमेरिकन खेळाडू मॅडिसनला पराभव स्वीकारावा लागला. स्वित्झर्लंडच्या टीमिया बासिनस्कीने मॅडिसनविरुद्ध ६-४, ६-२ ने सरशी साधली. बासिनस्कीची चौथ्या फेरीत पेत्रा क्वितोव्हासोबत गाठ पडणार आहे.