शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही क्रिकेटपटूची गुप्त माहिती उघड करणे चुकीचे- अनुराग ठाकूर

By admin | Updated: September 27, 2016 21:01 IST

बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी क्रिकेटपटूंची गुप्त माहिती उघड केल्याप्रकरणी माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी क्रिकेटपटूंची गुप्त माहिती उघड केल्याप्रकरणी माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. सचिन तेंडुलकर आणि एम एस. धोनीसारख्या महान क्रिकेटपटूंबाबतची गुप्त माहिती उघड करणं चुकीचं आहे. अशा प्रकारे त्यांची गुप्त माहिती उघड करणा-यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. संदीप पाटील हे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसंदर्भात काही गुप्त माहिती उघड केली होती. 2015च्या वर्ल्डकपच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार असलेल्या धोनीलाही त्यावेळी पदावरून दूर करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्या मुद्द्यावरूनच अनुराग ठाकूर यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. संदीप पाटील हे माजी निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही. जेव्हा ते अध्यक्ष होते त्यावेळी या विषयांवरील प्रश्नांना त्यांनी वेगळी उत्तर दिली होती. मात्र आता त्यांची भूमिका बदललेली दिसते आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. पाटील यांनी निवड समितीसारखं जबाबदारीचं पद सांभाळलं आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये करण्यापासून शक्यतो त्यांनी दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही सूतोवाच अनुराग ठाकूर यांनी केले आहेत.