शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पेनल्टी कॉर्नरवर भर

By admin | Updated: June 19, 2015 23:39 IST

भारतीय हॉकी संघाने पहिल्या सराव सामन्यात फ्रान्सवर विजय मिळविला असला तरी शनिवारपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या पहिल्याच लढतीत भारतीय

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाने पहिल्या सराव सामन्यात फ्रान्सवर विजय मिळविला असला तरी शनिवारपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या पहिल्याच लढतीत भारतीय संघ पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर भर देत विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचे मुख्य कोच पॉल वान यांनी कुठली कसर शिल्लक न राखता विजय मिळवा, असे खेळाडूंना आवाहन केले.ते म्हणाले, ‘भारतीय खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नर मिळवून चालणार नाही, तर या संधीचे गोलमध्ये रूपांतरदेखील करावे. सराव सामन्यात देखणी कामगिरी करणारा भारतीय संघ फॉर्ममध्ये आहे. उद्या खरे आव्हान पुढे आहे. ब्रिटनविरुद्धचा सामना आमच्यासाठी लाभदायी ठरला. त्यामुळे स्पर्धेतील दडपण कमी होण्यास मदत झाली. फ्रान्सचा संघ सहज हार मानत नसल्यामुळे प्रत्येक आघाडीवर आम्हाला सावध खेळावे लागेल. पेनल्टी कॉर्नर मिळविणे आणि गोलमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे.’ भारतीय संघ फ्रान्सविरुद्ध खेळेल त्याच वेळी महिला संघाची लढत बेल्जियमविरुद्ध होईल. नवव्या स्थानावर असलेल्या भारताच्या गटात आॅस्ट्रेलिया, पोलंड, फ्रान्स आणि पाक संघ आहे. मागचा रेकॉर्ड पाहिल्यास उद्याच्या सामन्यात फ्रान्सचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.चेंडूवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे!या सामन्यात नव्या डावपेचांसह खेळणार आहोत. चेंडूवर नियंत्रण ठेवणे आणि आक्रमक खेळणे गरजेचे आहे. सराव सामन्यात खेळलो त्याहून अधिक सर्वोत्तम खेळ करीत सामना जिंकू. सुरुवातीला मिळणाऱ्या संधीचा लाभ घेत दडपण आणण्याचा आमचा प्रयत्न राहील.- सरदारासिंग, कर्णधार, भारत.