शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोरिया ओपनमध्ये भारताची खराब सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 23:52 IST

भारताची मिश्र दुहेरी जोडी तरुण कोना - सिक्की रेड्डी यांना कोरिया ओपन बॅडमिंटन सुपर सिरिजच्या पहिल्याच फेरीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार

सोल : भारताची मिश्र दुहेरी जोडी तरुण कोना - सिक्की रेड्डी यांना कोरिया ओपन बॅडमिंटन सुपर सिरिजच्या पहिल्याच फेरीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अव्वल मानांकीत झांग ना - झाओ युन्लेइ यांच्या विरुद्ध पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टा आले.एकतर्फी झालेल्या या सामन्यात चीनी जोडीच्या आक्रमक खेळापुढे भारतीय जोडीला ११-२१, १०-२१ अशा मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. केवळ अर्धा तास रंगलेल्या या सामन्यात चीनी आक्रमणांपुढे तरुण - सिक्की यांचा निभाव लागला नाही. चांगली सुरुवात केल्यानंतर तरुण - सिक्की यांचा खेळ पुर्णपणे खालावला. पहिल्या सेटमध्ये ५-० अशी आघाडी घेतल्याचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले. दडपणाखाली केलेल्या चुकांचा फटका बसल्याने भारतीयांना सेट गमवावा लागला. यानंतरच्या सेटमध्ये मात्र चीनी खेळाडूंनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना भारतीय जोडीला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. आता सिक्की प्रज्ञा गद्रेच्या सोबतीने महिला दुहेरीमध्ये जपानच्या शिजुका मत्सुओ - मामी नेइतो यांच्याविरुध्द खेळेल. भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप आजपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. (वृत्तसंस्था)