शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला हॉकी संघाची आगेकूच

By admin | Updated: November 2, 2016 07:11 IST

चौथ्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी साखळी फेरीतील तिसऱ्या लढतीत मलेशियाचा २-० ने पराभव केला

सिंगापूर : भारतीय महिला संघाने कामगिरीत सातत्य राखताना चौथ्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी साखळी फेरीतील तिसऱ्या लढतीत मलेशियाचा २-० ने पराभव केला. या विजयासह भारताने गटात अव्वल स्थान कायम राखले. भारतासह गटात कोरिया, चीन, जपान आणि मलेशिया या संघांचा समावेश आहे. भारताने आज पहिली लढत खेळली. भारतावर बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या आशा कायम राखण्याचे दडपण होते. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करीत चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. सुरुवातीपासून आघाडी घेण्यास प्रयत्नशील असलेल्या मलेशियाने आक्रमक खेळ केला. भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पूनम राणीने मैदानी गोल नोंदवित भारताला आघाडी मिळवून दिली. चांगल्या सुरुवातीचा लाभ घेत भारताने आघाडी कायम राखली. मलेशियन खेळाडूंना आपल्या गोलक्षेत्रात मुसंडी मारण्याची संधी दिली नाही. मलेशिया संघाला या लढतीत पेनल्टी कॉर्नर मिळविता आला नाही. त्यांनी मैदानी गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय बचाव फळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. दीपिकाने ४५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यापूर्वी भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, पण त्यावर त्यांना गोल नोंदविता आला नाही. प्रत्येक वेळी भारताने वेगवेगळी व्यूहरचना वापरली, पण त्यांना यश आले नाही. दीपिकाने मात्र अनुभवाचा लाभ घेत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलच्या मदतीने दीपिकाने स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. भारताने चौथ्या व अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोलचा बचाव करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आणि मलेशियाला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. भारताला यानंतर ४ नोव्हेंबर रोजी चीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)