शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांनी जिंकली मालिका

By admin | Updated: February 18, 2016 06:29 IST

मध्यमगती गोलंदाज दीप्ती शर्मा (२३ धावांत ४ बळी) हिच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार मिताली राज (नाबाद ५३) हिच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला

रांची : मध्यमगती गोलंदाज दीप्ती शर्मा (२३ धावांत ४ बळी) हिच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार मिताली राज (नाबाद ५३) हिच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला बुधवारी दुसऱ्या वनडे सामन्यात ४१ चेंडू बाकी ठेवताना ६ गडी राखून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.भारताने श्रीलंकन संघाला ५० षटकांत ९ बाद १७८ धावांवर रोखल्यानंतर ४३.१ षटकांत ४ बाद १७९ धावा करून एकतर्फी विजय मिळविला. भारताने मालिकेतील पहिला सामना १०७ धावांनी जिंकला होता. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १९ फेब्रुवारी रोजी रांची येथे खेळवला जाईल. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (४६) आणि थिरुष कामिनी (२६) यांनी भारताला १३.२ षटकांत ६७ धावांची सुरुवात करून विजयाचा मजबूत पाया रचला. कामिनीने ४४ चेंडूंत ५ चौकार मारले, तर स्मृती मानधना हिने ४६ चेंडूंत ४ चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर कर्णधार मिताली राज हिने हरमनप्रीत कौर हिच्या साथीने ६४ धावांची भागीदारी करताना भारताचा विजय निश्चित केला. हरमनप्रीतने ६१ चेंडूंत ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर मितालीने दीप्ती शर्माच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मितालीने ८० चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. दीप्ती शर्मा ८ धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेकडून फिरकी गोलंदाज सुगंधा कुमारी हिने ३९ धावांत ४ गडी बाद केले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाने भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर नियमित अंतराने विकेट गमावल्या. त्यांच्याकडून सलामीवीर प्रसादनी वीराकोड्डीने ३७ आणि दिलानी मनोदराने नाबाद ४३ धावा केल्या. भारताकडून दीप्तीने २३ धावांत ४ गडी बाद केले. राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि हरमनप्रीत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकश्रीलंका : ५० षटकांत ९ बाद १७८. (प्रसादनी वीराकोड्डी ३७, दिलानी मनोदरा नाबाद ४३. दीप्ती शर्मा ४/२३).भारत : ४३.१ षटकांत ४ बाद १७९. (मिताली राज ५३, स्मृती मानधना ४६, थिरुष कामिनी २६. सुगंधा कुमारी ४/३९).