शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खेळाडू यश मिळविण्यास उत्सुक

By admin | Updated: January 2, 2017 00:35 IST

भारतीय टेनिसपटू एकेरीत अव्वल खेळाडू साकेत मायनेनीच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या एटीपी चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत आपल्या

चेन्नई : भारतीय टेनिसपटू एकेरीत अव्वल खेळाडू साकेत मायनेनीच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या एटीपी चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या मारिन सिलिचसह टेनिस जगतातील काही सर्वोत्तम खेळाडू सहभागी होत आहेत.
तीनवेळ जेतेपदाचा मान मिळवणारा स्टेनिसलास वावरिंकाच्या अनुपस्थितीनंतर यात दिग्गज खेळाडू सहभागी होत आहेत. त्यात एकेरीच्या ड्रॉमध्ये आघाडीच्या ५० पैकी सहा खेळाडूंचा समावेश आहे. सिलिचसाठी २०१६ हे वर्ष शानदार ठरले. त्याचा सहकारी व गेल्यावर्षी अंतिम फेरीत धडक मारणारा बोर्ना कोरिच, स्पेनचा रोबर्टा बातिस्ता एगुटा आणि एलबर्ट रामोस विनोलास यांचा समावेश राहील. त्यात युवा भारतीय खेळाडूंवर आपली उपस्थिती सिद्ध करण्याचे आव्हान राहणार आहे.
मायनेनी व स्थानिक खेळाडू रामकुमार रामनाथन टूरमध्ये आपली छाप सोडण्यास प्रयत्नशील आहेत, पण ते जास्तीत जास्त चॅलेंजर पातळीवर खेळलेले आहेत. या दोघांना मुख्य ड्रॉमध्ये वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला असून त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. भारताकडे एकमेव एटीपी २५० स्पर्धा आहे.
२९ वर्षीय मायनेनीने गेल्यावर्षी अमेरिकन ओपनची पात्रता मिळवली होती, पण त्याचा फिटनेस बघता एटीपी २५० पातळीवर त्याने सातत्य राखणे गरजेचे आहे.
भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू मायनेनीला रशियाच्या मिखेल युज्नीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. युज्नी जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानी आहे.
रामकुमारने कारकिर्दीच्या सुरुवातीला चमकदार कामगिरी करताना काही संस्मरणीय विजय मिळवले, पण त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याची सर्व्हिस व मैदानी फटके शानदार आहेत, पण मानसिक कणखरतेचा अभाव दिसतो. रामकुमारला पहिल्या फेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे प्रजनेश गुणेश्वरन आपली कारकीर्द सावरण्यास प्रयत्नशील आहे.


युकी भांबरी मुख्य फेरीत
कोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या युकी भांबरीने रविवारी दुसऱ्या फेरीत अर्जेंटिनाच्या निकोलस किकरचा ६-३, ६-१ ने पराभव केला आणि चेन्नई ओपनच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले. प्रजनेश गुणेश्वरनला मात्र पराभव स्वीकारावा लागला.
युकीने किकरचा केवळ ५९ मिनिटांमध्ये पराभव केला. मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत त्याला मायदेशातील डेव्हिस कप संघातील सहकारी रामकुमार रामनाथनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
प्रजनेशने पात्रता फेरीच्या अखेरच्या लढतीत स्लोव्हाकियाच्या जोसेफ कोवालिकविरुद्ध ६-७, २-६ ने पराभव केला. मुख्य ड्रॉच्या एकेरीमध्ये आता तीन भारतीय खेळाडू खेळतील. युकी व रामनाथन यांच्याव्यतिरिक्त साकेत मायनेनी यांचा एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये समावेश अहे. मायनेनीची सलामी लढत रशियाचा अनुभवी मिखाईल युज्नीसोबत होणार आहे.


दुहेरीमध्ये भारताची पकड मजबूत दिसत आहेत. त्यात महान खेळाडू लिएंडर पेसव्यतिरिक्त चार जोड्या सहभागी होत आहेत. पेस ब्राझीलच्या आंद्र सा याच्या साथीने खेळणार आहे.
अनुभवी पेसला पहिल्या फेरीत मायदेशातील सहकारी दिविज शरण व पुरव राजा या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. राजा व शरण यांची २०१६ मध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
त्यांना मायदेशात तिसरे एटीपी जेतेपद पटकावण्याची संधी आहे. गेल्यावर्षी त्यांनी लोस काबोसमध्ये जेतेपद पटकावले.


२०१३ ते २०१५ या कालावधीत सलग तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या वावरिंकाच्या अनुपस्थिीतीत क्रोएशियाचा सिलिच २०१६ मधील कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. गेल्यावर्षी त्याने पॅरिस मास्टर्समध्ये नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव केला होता. त्यापूर्वी त्याने सिनसिनाटीमध्ये कारकिर्दीत प्रथमच मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्याने अंतिम फेरीत अँडी मरेचा पराभव केला होता. मोसमाच्या अखेर त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम सहावे मानांकन मिळवले आहे.
सिलिचने टेनिस जगतातील चार आघाडीच्या खेळाडूंना आव्हान दिले आहे. भारतातील एकमेव एटीपी २५० स्पर्धेत सहभागी होणारे सर्वोत्तम खेळाडू आहे. चाहते या दिग्गजाचा खेळ बघण्यास उत्सुक आहेत. सिलिचने येथे २००९ व २०१० मध्ये जेतेपद पटकावले होते. तो निश्चितच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.
जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या बातिस्ता एगुटसाठी २०१६ हे चांगले वर्ष ठरले. त्याने दोन एटीपी जेतेपद पटकावले आणि सर्बियाचा महान खेळाडू जोकोव्हिचचा पराभव केला.
कोरिचने २०१३ च्या अखेरीस व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश केला.
२० वर्षीय क्रोएशियन खेळाडू चेन्नईमध्ये छाप सोडण्यास उत्सुक आहे.