रायपूर : आकाशदीप सिंगने अखेरच्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर भारताने विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाचा तिसऱ्या व अखेरच्या हॉकी कसोटी सामन्यात ३-२ ने पराभव केला, पण त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये मालिका गमावली. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानची मालिका १-१ ने बरोबरी संपल्यानंतर शूटआऊटचा आधार घेण्यात आला. त्यात आॅस्ट्रेलियाने ३-२ ने बाजी मारली. भारताकडे अखेरच्या शॉटवर बरोबरी साधण्याची व निकाल सडन डेथपर्यंत लांबवण्याची संधी होती, पण आॅस्ट्रेलियाचा गोलकिपर क्लेमॅन्सने ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पालसिंगचा स्ट्रोक रोखला. या निकालामुळे आॅस्ट्रेलियाने मालिका जिंकली. (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}