भारत-श्रीलंका सलामी लढत कटकला

By Admin | Updated: October 26, 2014 01:37 IST2014-10-26T01:37:09+5:302014-10-26T01:37:09+5:30

मानधनाच्या मुद्दय़ावर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडल्यामुळे अत्यल्प वेळेत भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान पाच वनडे सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले आहे.

India-Sri Lanka's opening game against Cuttack | भारत-श्रीलंका सलामी लढत कटकला

भारत-श्रीलंका सलामी लढत कटकला

नवी दिल्ली : मानधनाच्या मुद्दय़ावर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडल्यामुळे अत्यल्प वेळेत भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान पाच वनडे सामन्यांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. 
मालिकेतील पहिला सामना 2 नोव्हेंबर रोजी कटक येथे खेळला जाणार आहे. मालिकेतील सर्वच सामने दिवस-रात्र खेळले जाणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. 
वनडे सामन्यांच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघ 3क् ऑक्टोबर रोजी मुंबई येथे भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. वेस्ट इंडीज संघ धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या वनडे सामन्यानंतर मायदेशी परतला. विंडीज संघ या मालिकेत पाच वनडे, एक टी-2क् आणि तीन कसोटी सामने खेळणार होता.  (वृत्तसंस्था)
 
अशी असेल मालिका़़़
2 नोव्हेंबर : कटक 
6 नोव्हेंबर : अहमदाबाद 
9 नोव्हेंबर : हैदराबाद
13 नोव्हेंबर : कोलकाता
16 नोव्हेंबर : रांची

 

Web Title: India-Sri Lanka's opening game against Cuttack