शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बेल्जियमकडून भारत पराभूत

By admin | Updated: June 14, 2016 03:59 IST

बेल्जियमने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सोमवारी ३६ व्या हीरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा २-१ ने पराभव केला.

लंडन : बेल्जियमने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सोमवारी ३६ व्या हीरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा २-१ ने पराभव केला.
गेल्या लढतीत यजमान ब्रिटनचा पराभव करीत आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाची या स्पर्धेत बेल्जियमविरुद्धची कामगिरी चांगली झाली, पण बेल्जियमच्या मजबूत बचावाने भारताचे विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.
या युरोपियन संघाने २०११ पासून भारतावर वर्चस्व गाजवले आहे. यावेळीही बेल्जियमने वर्चस्व कायम राखले. सातवे मानांकन असलेल्या भारताने यापूर्वीच्या लढतीत ब्रिटनचा २-१ ने पराभव केला होता, तर आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीला ३-३ ने बरोबरीत रोखले. बेल्जियम व भारताच्या खात्यावर समान चार गुण आहेत. आॅस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत तीन सामन्यानंतर सात गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ब्रिटन, भारत आणि बेल्जियम हे संघ आहेत.
बेल्जियमचा बचाव भेदण्याचे भारतापुढे कडवे आव्हान होते. बेल्जियमने या लढतीत आठ पेनल्टी कॉर्नर मिळवले, तर भारताला केवळ एक पेनल्टी कॉर्नर मिळवता आला.
बेल्जियमतर्फे अलेक्झांडर हेन्ड्रिक्सने २५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तोपर्यंत बेल्जियमने चार पेनल्टी कॉर्नर मिळवले होते. भारताने त्यानंतर आक्रमक खेळ केला. ३० व्या मिनिटाला देवेंद्र वाल्मिकीने मैदानी गोल नोंदवत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. एस. व्ही. सुनीलची गोल करण्याची संधी हुकल्यानंतर रिबाऊंडवर वाल्मिकीने शानदार गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत उभय संघ १-१ ने बरोबरीत होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये उभय संघांनी संघर्षपूर्ण खेळ केला. जेरोम ट्युयेन्सने ४४ व्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमने ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. (वृत्तसंस्था)