भारताची पाकवर मात

By Admin | Updated: August 18, 2014 02:21 IST2014-08-18T02:21:18+5:302014-08-18T02:21:18+5:30

मैत्रीपूर्ण मालिकेतील रविवारी बंगळुरूतील फुटबॉल स्टेडियममध्ये खेळलेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाचा १-०ने पराभव केला

India beat Pakistan | भारताची पाकवर मात

भारताची पाकवर मात

बंगळुरू : भारत आणि पाकिस्तानदरम्यान २३ वर्षांखालील फुटबॉलपटूंच्या दोन सामन्यांच्या मैत्रीपूर्ण मालिकेतील रविवारी बंगळुरूतील फुटबॉल स्टेडियममध्ये खेळलेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाचा १-०ने पराभव केला.
सामन्यात ४४व्या मिनिटाला रॉबिन सिंगने कर्णधार सुनील छेत्रीच्या क्रॉसवर हेडरद्वारा नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. रॉबिनचा हेडर बारला लागला, पण चेंडूने गोल रेषा ओलांडली होती. भारताला या लढतीत मोठ्या फरकाने विजय नोंदविण्याची संधी होती, पण भारतीय खेळाडूंनी गोल नोंदविण्याच्या अनेक नामी संधी गमाविल्या. मालिकेतील दुसरा सामना २० आॅगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
रॉबिनला मध्यांतरानंतर दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखविण्यात आल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर भारतीय संघाला १० खेळाडूंसह खेळावे लागले, पण भारताने बचाव भक्कम राखताना पाकला बरोबरी साधण्याची संधी दिली नाही. भारत आणि पाक यांच्यात २००५मध्ये फुटबॉल मालिका खेळली होती. त्या वेळी भारताने पाक दौरा केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: India beat Pakistan