हैदराबादचं पुण्यासमोर 138 धावांचं लक्ष्य

By Admin | Updated: May 10, 2016 21:39 IST2016-05-10T21:39:37+5:302016-05-10T21:39:37+5:30

सनरायझर्स हैदराबादनं रायझिंग पुणे सुपरजाएंट्ससमोर 138 धावांचं टार्गेट ठेवलं

Hyderabad's goal of 138 runs in front of Pune, | हैदराबादचं पुण्यासमोर 138 धावांचं लक्ष्य

हैदराबादचं पुण्यासमोर 138 धावांचं लक्ष्य

 ऑनलाइन लोकमत

विशाखापट्टणम, दि. 10- सनरायझर्स हैदराबादनं रायझिंग पुणे सुपरजाएंट्ससमोर 138 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्यात. कॅप्टन वॉर्नरनं 14 चेंडूंमध्ये 1 षटकार लगावत 11 धावा काढून चांगली सुरुवात करून दिली. धवननं 2 चौकार आणि 2 षटकार खेचत 33 धावांची खेळी केली. युवराज सिंग आणि हुडानंही प्रत्येकी 2 षटकार मारत संघाच्या धावांमध्ये भर घातली. विल्यमसन 31, युवराज सिंग 23, हेनरिक 10, हुडा 14, ओझा 7, कुमार 1 धावा काढून तंबूत परतले. रायझिंग पुणे सुपरजाएंट्सच्या झांपानं ख-या अर्थानं भेदक गोलंदाजीच्या जोरावर युवराज, विल्यमसन, हेनरिक, हुडा, ओझा, कुमार अशा सहा जणांचे बळी घेऊन त्यांना 137 धावांवर रोखलं. तर आर. पी. सिंग आणि अश्विननंही प्रत्येकी एक बळी घेऊन चांगली गोलंदाजी केली.  
 

Web Title: Hyderabad's goal of 138 runs in front of Pune,