शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या हव्यात

By admin | Updated: November 4, 2015 01:37 IST

वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीबाबत झालेला वाद आता इतिहास असून यजमान संघ स्वत:ला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात आणि यात लपविण्यासारखे काही नाही, असे

मोहाली : वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीबाबत झालेला वाद आता इतिहास असून यजमान संघ स्वत:ला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात आणि यात लपविण्यासारखे काही नाही, असे टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.भारतीय संघ ५ नोव्हेंबरपासून जगातील अव्वल कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. शास्त्री म्हणाले, ‘या मालिकेच्या निमित्ताने चुरस अनुभवायला मिळेल.’पीसीए स्टेडियममध्ये बोलताना शास्त्री म्हणाले,‘यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या मिळायला हव्यात. यात लपविण्यासारखे काही नाही. वर्षानुवर्षे असेच चालत असून आपल्या देशात आपण याची अपेक्षा करायला हवी. दक्षिण आफ्रिका किंवा आॅस्ट्रेलियात खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून चेंडू वळत नाही, येथे काय होते हे बघावे लागेल. दक्षिण आफ्रिका संघ फॉर्मात असून गेल्या १० वर्षांतील ही सर्वोत्तम मालिका होईल.’ शास्त्री पुढे म्हणाले की, कोहली बऱ्याच दिवसांपासून कसोटी कर्णधारपद सांभाळत आहे. श्रीलंकेत मालिका विजय मिळविल्यामुळे कोहली कर्णधार म्हणून परिपक्व होत असल्याची प्रचिती येते. (वृत्तसंस्था)रविचंद्रन आश्विन ठणठणीत असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. आश्विन चांगली गोलंदाज करीत आहे. आमच्या संघात अन्य दोन फिरकीपटू असून, पाहुणा संघ जर केवळ आश्विनवर लक्ष देणार असेल, तर अन्य दोन फिरकीपटू त्यांच्यापुढे अडचण निर्माण करू शकतात, हे विसरता येणार नाही.- रवी शास्त्री