शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

रिले संघ फायनलमध्ये पोहोचण्याची आशा!

By admin | Updated: August 20, 2016 02:24 IST

लंडन आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये टिंटू लुकाला जी संधी मिळाली त्यात तिने सर्वश्रेष्ठ प्रयत्न केला. दुर्र्दैवाने ती हिटमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. एकूण आठ हिटमधील विजेता आणि दुसऱ्या

- पी. टी. उषा लिहितातलंडन आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये टिंटू लुकाला जी संधी मिळाली त्यात तिने सर्वश्रेष्ठ प्रयत्न केला. दुर्र्दैवाने ती हिटमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. एकूण आठ हिटमधील विजेता आणि दुसऱ्या स्थानावरील खेळाडूंपैकी उत्कृष्ट वेळ नोंदविणारे एकूण आठ खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतात, असा नियम आहे. अशावेळी अनेक खेळाडू फायनलमध्ये पात्रतेपासून वंचित राहतात. पण त्यांना हिटमध्ये पहिल्या दोन स्थानांवर राहण्याचा लाभ होतो. कामगिरी सुधारण्यासासाठी आॅलिम्पिकपूर्वी आमच्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून द्यावी, इतकीच माझी मागणी आहे. आॅलिम्पिकमध्ये भविष्यात निराशादायी कामगिरी टाळण्यासाठी हा कार्यक्रम राबवायला हवा. गेल्या काही वर्षांपासून खेळाडूंना सातत्याने एक्स्पोझर मिळत आहे पण यात सातत्य राखायला हवे.३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ललिता बाबर आणि २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीतील मुलींचा अपवाद वगळता अ‍ॅथ्लीटस्च्या कामगिरीवर मी समाधानी नाही. मला महिला आणि पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाकडून अद्यापही अपेक्षा आहेत. सोबतच २० किमी पायी चालणे आणि ५० किमी पायी चालणे यातही आशा असेल. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये भारताने दोनदा अंतिम फेरी गाठली आहे. मी करियरच्या सर्वोच्च शिखरावर असताना एकदा अंतिम फेरीत मी धावले. त्यानंतर २० वर्षानंतर अथेन्समध्ये २००४ साली नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवित रिले संघ अंतिम फेरीत पोहोचला. यावेळी अशीच अपेक्षा आहे. ४ बाय ४०० मीटर रिले प्रकारात महिला संघ तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेची नोंद करू शकला किंवा अंतिम फेरीत दाखल झाला तर मला सर्वाधिक आनंद होईल.पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये जपान आणि चीनचे संघ अंतिम फेरीत दाखल झाले. यामुळे भारताला प्रेरणा मिळाली. यामुळे एक संदेश असा गेला की तुमच्या संघात बोल्ट आणि गॅटलिनसारखे खेळाडू नसतीलही पण सांघिक कामगिरीच्या बळावर यश मिळू शकते. बोल्ट आणि एलेनी थॉम्पसन यांनी १०० व २०० मीटरचे पुरुष आणि महिला गटाचे सुवर्ण जिंकून मला प्रभावित केले. पण रिओ आॅलिम्पिकमध्ये सर्वांत महान कामगिरी ४०० मीटरमध्ये द. अमेरिकेचा वेड वॉन निकीर्क याने केली. त्याने विश्व विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. (टीसीएम)