शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

हिना सिद्धूचा निर्णायक क्षणी नेम चुकला

By admin | Updated: April 14, 2015 02:04 IST

विश्व क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू भारतीय नेमबाज हिना सिद्धू आरएसएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या अंतिम फेरीपासून वंचित राहिली.

चोंगवान (कोरिया) : विश्व क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू भारतीय नेमबाज हिना सिद्धू आरएसएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या अंतिम फेरीपासून वंचित राहिली. चौथ्या दिवशी महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात हिनाचा नेम थोड्या फरकाने चुकला.पात्रता फेरी आटोपल्यानंतर हिना आणि अन्य पाच नेमबाजांकडे ४०० पैकी ३६५ गुण होते. या फेरीत प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट मारायचे होते. पण हिनाने अन्य नेमबाजांच्या तुलनेत ‘इनर टेन’मध्ये सर्वांत दूर नेम साधताच ती बाहेर झाली. अन्य प्रतिस्पर्धी फायनलसाठी पात्र ठरले. दहा मीटर एअर रायफलमधील दुसरी भारतीय खेळाडू श्वेता चौधरी पात्रता फेरीत ३७८ गुणांसह ३४ व्या आणि अन्नुराजसिंग ३७५ गुणांसह ५५ व्या स्थानावर आली. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये लज्जा गोस्वामी, एलिझाबेथ सुसान कोशी आणि अंजली भागवत या सर्व जणी पात्रता फेरीपुढे सरकण्यात अपयशी ठरल्या. लज्जाने ५७८ गुणांसह १६ वे, एलिझाबेथने ५७६ गुणांसह २० वे आणि अंजलीने ५६६ गुणांसह ५७ व्या स्थानावर समाधान मानले. या स्पर्धेत क्रोएशियाची पी. सन्जेजाना हिने विश्वचषकात स्वत:चे दुसरे सुवर्ण जिंकले. तिने अंतिम फेरीत ४६३ गुण नोंदवित विश्वविक्रमदेखील केला. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात आॅलिम्पिक रौप्यविजेता विजय कुमार आणि गुरुप्रीतसिंग यांनी पात्रता फेरीत पहिल्या राऊंडमध्ये २७८ गुण नोंदविले. हे दोघेही फायनलमध्ये खेळण्याआधी दुसऱ्या पात्रता फेरीला सामोरे जाणार आहेत. (वृत्तसंस्था)पात्रता फेरी आटोपल्यानंतर हिना आणि अन्य पाच नेमबाजांकडे ४०० पैकी ३६५ गुण होते. या फेरीत प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट मारायचे होते. हिनाने अन्य नेमबाजांच्या तुलनेत ‘इनर टेन’मध्ये सर्वात दूर नेम साधताच ती बाहेर झाली. अन्य खेळाडू फायनलसाठी पात्र ठरले.