शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

हर्षा भोगले कॉलम

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

लंकेच्या फलंदाजांना मोठा अनुभव!

लंकेच्या फलंदाजांना मोठा अनुभव!
हर्षा भोगले लिहितो...
मोठ्या स्पर्धेत फायनल गाठण्याची सवय लागलेला श्रीलंका संघ आता पटाईत झाला आहे; तरीही अनेक जण या संघाविषयी चर्चा करीत नाहीत. लंकेचा पाठीराखा असतो तर असे ऐकून नाराज झालो असतो. कागदावर तरी हा संघ बलाढ्य आणि संतुलित दिसत आहे.
अलीकडे मी ज्यांच्यासोबत चर्चा केली त्या सर्वांनी विश्वचषकात अनुभवाची गरज असते, असेच सांगितले. लंका संघातील सुरुवातीच्या चारपैकी तीन फलंदाजांकडे विश्वचषकात खेळल्याचा मोठा अनुभव आहे. यापैकी दोन तर जबर फॉर्ममध्ये आहेत. संगकारा लंका क्रिकेट बोर्डावर नाराज असला तरी फलंदाजीत त्याने सर्वस्व पणाला लावल्याचे आपण पाहत आहोत. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने लंकेला विश्वचषकाची पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठायची झाल्यास त्यात संगकाराची भूमिका मोलाची ठरेल.
दिलशान २०१५ च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकेल का, असा प्रश्न काही वर्षांआधी पडला असावा; पण तो खेळतच आहे आणि संघासाठी अलीकडे त्यानेही उत्तम खेळी केली. तो फिट असून सलग धावा काढत आहे. माहेला जयवर्धनेबाबत बोलायचे झाल्यास तो फॉर्ममध्ये नसेलही, पण कधीही त्याला सूर गवसू शकतो. लंका क्रिकेटमधील ही त्रिमूर्ती आपल्या विशेष अंदाजात क्रिकेटला अलविदा करेल, यात शंका नाही.
या संघात मोठ्या अनुभवाशिवाय युवाजोष आहे. संगकाराशिवाय अँजेलो मॅथ्यूज हा लंका क्रिकेटसाठी महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. मॅथ्यूज भेदक मारा करतो, शिवाय अव्वल सहा फलंदाजांमध्ये धावांचेही योगदान देऊ शकतो. आशियाई देशांसाठी लंका संघासाठी हा विशेष लाभ ठरावा. मॅथ्यूज-थिसारा परेरा यांच्यामुळे संघात संतुलन निर्माण होते. या संघाकडे उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि आघाडीच्या सहा गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे परेरा सातव्या स्थानावर चांगला पर्याय आहे. तरीही सत्य हेच, की लंकेकडे तळाच्या फळीत चांगली फलंदाजी नाहीच. कुलसेकरा याला आपण जितके पाहतो त्यापेक्षा तो चांगला खेळाडू आहे. अशा वेळी गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान लंकेकडे असेल. नुकत्याच झालेल्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध लंकेच्या फिरकीपटूंनी तब्बल ३५ षटके टाकली होती. वेगवान आणि फिरकी मार्‍याचा हा योग्य समन्वय नव्हता.
लसिथ मलिंगा याने परफेक्ट यॉर्कर न टाकल्यास त्याचीही धुलाई होऊ शकते. आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडून बारीक चूक झाली तरी त्यावर चार धावा गेल्याचे उदाहरण घडत आहे. मलिंगाकडून स्पर्धेच्या उत्तरार्धात अधिक चांगली कामगिरी होण्याची शक्यता आहे. विश्वचषकाआधी त्याने अलीकडे खूप जास्त गोलंदाजी केलेली नाही. हेराथ, सेनानायके आणि सुरंगा लकमल यांच्या रूपाने लंकेकडे भारतीय उपखंडात उत्तम मारा करणारे गोलंदाज आहेत. माझ्या मते लंका संघ दावेदार म्हणून स्वत:ला सादर करेल. त्यासाठी संगकारा आणि मॅथ्यूज यांना मोलाची भूमिका वठवावी लागेल. (टीसीएम)