शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत

By admin | Updated: March 5, 2017 14:28 IST

फलंदजांची कसोटी घेणाऱ्या चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 5 - फलंदजांची कसोटी घेणाऱ्या चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाने अतिबचावात्मक पवित्रा घेतला आहे. चहापानाला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद 163 धावा झाल्या होत्या. अश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्माने टिच्चून मारा केल्याने आज सकाळपासूनच पाहुण्या फलंदाजांना एकेका धावेसाठी झगडावे लागले. दरम्यान, अश्विनने एका अप्रतिम चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची (33) दांडी गुल करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. वॉर्नर बाद झाल्यावर मॅट रेनशॉ आणि स्टीव्हन स्मिथने सावध पवित्रा घेतला. त्यातच भारताकडूनही तिखट मारा झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या धावांचा ओघ आटला. रेनशॉ आणि स्मिथची जोडी भारताची डोकेदुखी वाढवणार असे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने स्मिथची विकेट काढली. जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण वृद्धिमान साहाने स्मिथचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर रेनशॉ आणि शॉन मार्श यांनी उपाहारापर्यंत अधिक नुकसान होऊ न देता ऑस्ट्रेलियाला 2 बाद 87 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

उपाहारानंतर रेनशॉ आणि शॉन मार्शने पुन्हा भारताच्या गोलंदाजांना सतावले. दरम्यान रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र तो 60 धावा काढून जडेजाची शिकार झाला. त्यानंतर हँडस्काँबने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर अश्विनने एक अप्रतिम झेल टिपत हँडस्काँबला परतीची वाट दाखवली. त्यानंतर मिचेल मार्शही चहापानापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर इशांत शर्माची शिकार झाला. ऑस्ट्रेलियन संघ अद्याप 26 धावांनी पिछाडीवर आहे.