शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

क्लार्कपाठोपाठ हॅडिनचीही वन-डेतून निवृत्ती

By admin | Updated: March 30, 2015 23:56 IST

आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने संघाला विश्वविजेतपद मिळवून दिल्यानंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने संघाला विश्वविजेतपद मिळवून दिल्यानंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला; आता त्याच्यापाठोपाठ उपकर्णधार ब्रॅड हॅडिननेही निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा पराभव करीत विश्वचॅम्पियन ठरलेल्या आॅस्ट्रेलियन संघातील ३७ वर्षीय हॅडिनने निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वी क्लार्कने अंतिम लढतीपूर्वीच वन-डेमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. निवृत्ती स्वीकारण्याची हीच वेळ योग्य असल्याचे हॅडिन म्हणाला. आॅस्ट्रेलिया संघ आता वन-डे क्रिकेटमध्ये नव्या अध्यायाला प्रारंभ करणार असल्याचे हॅडिनने सांगितले. हॅडिन व क्लार्क यापुढेही कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. विंडीज व इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिकेत संघाचे नेतृत्व करणार असल्याचे क्लार्कने स्पष्ट केले होते. हॅडिनने निवृत्तीच्या निर्णयाला विनोदाचा मुलामा दिला. हॅडिन म्हणाला, ‘‘न्यूझीलंडच्या खेळांडूच्या सभ्य व विनम्र वर्तनामुळे मी यापुढे वन-डे क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंचे वर्तन सभ्य होते. मी अशाप्रकारे क्रिकेट खेळू शकत नाही.’’ (वृत्तसंस्था)