गुड मॉर्निंग, अंकुर, विजय बजरंग यांची आगेकूच

By Admin | Updated: December 26, 2014 01:54 IST2014-12-26T01:54:06+5:302014-12-26T01:54:06+5:30

गुड मॉर्निंग, अंकुर आणि विजय बजरंग या संघांनी आपआपल्या सामन्यात विजयी बाजी मारताना यंग भारत सेवा,

Good morning, Ankur, Vijay Bajrang ahead | गुड मॉर्निंग, अंकुर, विजय बजरंग यांची आगेकूच

गुड मॉर्निंग, अंकुर, विजय बजरंग यांची आगेकूच

मुंबई : गुड मॉर्निंग, अंकुर आणि विजय बजरंग या संघांनी आपआपल्या सामन्यात विजयी बाजी मारताना
यंग भारत सेवा, प्रभादेवी यांच्या वतीने आयोजित प्रथम श्रेणी पुरुष कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात गुड मॉर्निंग संघाने अनपेक्षित आगेकूच करताना कसलेल्या गोल्फादेवीचा पिछाडीवरून २६-२१ असा पाडाव केला. सुरुवातीला गोल्फादेवीने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना मध्यांतराला १४-१३ अशी एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली होती. विराज उतेकर, लक्ष्मण दलतोडे यांनी चतुरस्र खेळ करताना गुड मॉर्निंग संघावर लोण चढवताना गोल्फादेवीला आघाडी मिळवून दिली. मात्र यानंतर सुनील सावंतने चढाई करताना ४ गडी मारत गोल्फादेवीला जबरदस्त झटका दिला.
यानंतर झालेल्या आणखी एका चुरशीच्या सामन्यात विजय बजरंगने झुंजार खेळ करताना जय भारतचे आव्हान २३-२० असे परतावून लावले. सुरुवातीपासून पारडे वर-खाली होणाऱ्या या सामन्यात मध्यांतराला विजय संघाने १५-१३ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र त्यांना जय भारतच्या प्रतिकाराचा सामना करावा लागला.
अजय कुसुमचा अष्टपैलू खेळ व त्याला मिळालेली ओम्कार नेमाणेची उपयुक्त साथ या जोरावर विजय बजरंगने स्पर्धेत विजयी आगेकूच केली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Good morning, Ankur, Vijay Bajrang ahead