सांघिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्ण

By Admin | Updated: November 6, 2016 23:52 IST2016-11-06T23:52:26+5:302016-11-06T23:52:26+5:30

महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते, ऋतुजा सोलट, मधुरा वायकर आणि वैष्णवी गबणे यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून, २१ व्या वरिष्ठ, ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद

Gold in Team Time Trial | सांघिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्ण

सांघिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्ण

पुणे : महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते, ऋतुजा सोलट, मधुरा वायकर आणि वैष्णवी गबणे यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून, २१ व्या वरिष्ठ, ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत ३० किलोमीटर सांघिक टाइम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. शनिवारी मधुरा वायकरने सुवर्ण व ऋतुजा सातपुतेने रौप्य पदक जिंकले होते.
अलिगर (उत्तर प्रदेश) येथे सुरूअसलेल्या या स्पर्धेत रविवारी सायंकाळी झालेल्या या महिलांच्या ३० किलोमीटर सांघिक टाइम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते, मधुरा वायकर, ऋतुजा सोलट, वैष्णवी गबणे यांनी शर्यतीच्या सुरुवातीपासून जोरदार आघाडी घेत या चौघींनी सुवर्णपदक संपादन केले. महाराष्ट्राच्या महिलांनी ३० किलोमीटरचे अंतर ४९ मिनीट ४५.४५९ सेकंदाची वेळ नोंदविली. या प्रकारात कर्नाटक संघाला (४९ मिनीट ५४.२४६ सेकंद) रौप्य तर हरियाणा संघाने कांस्यपदकावर (५० मिनीट ४४.९३६ सेकंद) समाधान मानावे लागले. या प्रकारात प्रत्येक संघाला ३-३ मिनिटांच्या अंतराने सोडले जाते. प्रत्येक संघाची वेळ घेतली जाते. यातही महाराष्ट्राच्या महिलांनी आपला दबदबा कायम राखला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Gold in Team Time Trial