शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ला झोकून दबावाखाली खेळण्यास सज्ज व्हा!

By admin | Updated: June 17, 2016 05:26 IST

आॅलिम्पियन बनण्यासाठी त्या खेळाडूला सर्वप्रथम खेळाप्रती काही मूल्यांचे पालन करावे लागेल, त्याचप्रमाणे त्या खेळामध्ये स्वत:ला झोकून देत दबावाखाली खेळण्याची तयारी दाखवावी

मुंबई : आॅलिम्पियन बनण्यासाठी त्या खेळाडूला सर्वप्रथम खेळाप्रती काही मूल्यांचे पालन करावे लागेल, त्याचप्रमाणे त्या खेळामध्ये स्वत:ला झोकून देत दबावाखाली खेळण्याची तयारी दाखवावी लागेल, असे आॅस्टे्रलियाचा माजी दिग्गज जलतरणपटू इयान थॉर्प याने सांगितले. मुंबईत गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात थॉर्पची आघाडीच्या क्रीडा वाहिनीच्या आॅलिम्पिक पॅनलमध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या वेळी थॉर्पसह माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण, नेमबाज अंजली भागवत, माजी हॉकीपटू वीरेन रस्किन्हा आणि जलतरणपटू रेहान पोंचा यांचीही उपस्थिती होती. त्याचप्रमाणे, आॅस्टे्रलियामध्ये क्रीडाक्षेत्रासाठी विशिष्ट वातावरण आहे. आमच्या देशात आॅलिम्पिकची शानदार परंपरा आहे, ज्याला मी पुढे नेले.निशानेबाजांना आॅलिम्पिकमध्ये मानसिकरीत्या सक्षम बनावे लागेल. मानसिकरीत्या सज्ज झाल्यास त्यांना जगातील अव्वल खेळाडूंविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळेल. लंडन आॅलिम्पिकनंतर खेळाचे नियम बदल्याने निशानेबाजी अधिक आव्हानात्मक झाली आहे. एकाही भारतीय नेमबाजाला मागील चार वर्षांमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सध्या पदकांबाबत काही सांगता येणार नाही. - अंजली भागवत