शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी चेंडूच्या सामन्यासाठी ईडन सज्ज

By admin | Updated: June 17, 2016 05:27 IST

भारतात पहिल्यांदा गुलाबी चेंडूच्या वापराने डे-नाईट क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचे यजमानपद भूषविण्यास ऐतिहासिक ईडन गार्डन सज्ज झाले.

कोलकाता : भारतात पहिल्यांदा गुलाबी चेंडूच्या वापराने डे-नाईट क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचे यजमानपद भूषविण्यास ऐतिहासिक ईडन गार्डन सज्ज झाले. सुपरलीग स्पर्धेचा अंतिम सामना यंदा गुलाबी चेंडूने खेळविला जाईल. चार दिवसांचा हा डे-नाईट सामना १८ जूनपासून सुरू होईल. गुलाबी चेंडूने डे-नाईट सामना खेळविण्यावर जगभर सध्या वाद सुरू आहे. भारताने मात्र यात पुढाकार घेतला असून, चार दिवसांचा सामना प्रायोगिक तत्त्वावर खेळविण्यावर भर दिला. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडिलेड मैदानावर जगातील पहिला डे-नाईट आंतरराष्ट्रीय वन डे खेळविण्यात आला. हा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला होता. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरभ गांगुली याच्या नेतृत्वात आॅस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्स, भारताचा माजी कलात्मक फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आणि समालोचक हर्षा भोगले यांनी गुरुवारी झालेल्या एका चर्चेत भाग घेतला. या चर्चेत गुलाबी चेंडूच्या वापरामुळे होणारे लाभ आणि हाणी या दोन्ही पैलूंवर मत मांडण्यात आले. या चर्चेअंती गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळणे हे भविष्यासाठी लाभदायी असेल, असे मत व्यक्त करण्यात आले. गुलाबी चेंडूमुळे कसोटी क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल होतील, अशी अपेक्षा सौरव गांगुली याने व्यक्त केली. देशात प्रथमच दिवस-रात्रीचा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळविण्याबाबत बीसीसीआयच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे निर्देश आल्यानंतरच न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात दिवस-रात्रीचा कसोटी सामना होतो किंवा नाही हे निश्चित होईल. - सौरव गांगुलीगेल्या दशकापासून फलंदाजांना पूरक नियम बनले. पण गुलाबी चेंडूमुळे सामना बरोबरीचा असेल. हा चेंडू अधिक स्विंग होईल. हा चेंडू डोळ्याने पाहतानादेखील कुठली अडचण येत नाही. लोकांना मैदानाकडे ओढण्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर हे मार्केटिंग ठरावे.- डीन जोन्सगुलाबी चेंडू फिरकीपटूंकडून तपासून घ्यावा. आश्विनसारख्या फिरकी गोलंदाजाकडून हा चेंडू किती टर्न होतो हे पाहावे लागेल. ५० षटकांच्या सामन्यात हा चेंडू रंगहीन होण्याची भीती आहे. शिवाय चेंडू थोडा नरम झाल्याने गोलंदाजांच्या बोटांना अवघडल्यासारखे वाटू शकते. तरीही गोलंदाज यावर उपाय शोधतील.- व्हीव्हीएस लक्ष्मण