शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा रावराणेचा नरसिंगकडून गौरव

By admin | Updated: March 3, 2017 05:33 IST

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पूर्णा रावराणेचा स्टार मल्ल नरसिंग यादवच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मुंबई : तुर्कस्थान येथे गतवर्षी झालेल्या जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पूर्णा रावराणेचा स्टार मल्ल नरसिंग यादवच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत कायम आपली छाप पाडणाऱ्या दहिसर येथील व्हीपीएम स्पोटर््स क्लबच्या २७व्या वार्षिक पुरस्कार कार्यक्रमात नरसिंगची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी, क्लबच्या गुणवान खेळाडूंना नरसिंगच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जागतिक शालेय स्पर्धेत पूर्णाने गोळाफेक प्रकारात राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली होती. मात्र, पदकाने तीला थोडक्यात हुलकावणी दिली. विशेष म्हणजे फारशा सुविधा नसतानाही पूर्णाने केवळ व्हीपीएम क्लबमधील कठोर सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय झेप घेत लक्षवेधी कामगिरी केली. त्याचप्रमाणे कॉसमॉस परेरा यांना व्हीपीएम भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शिवाय, राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या क्लबच्या एकूण १२ खेळाडूंनाही यावेळी गौरविण्यात आले. परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबची मुंबई उपनगरात प्रगती झाली, शिवाय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी क्लबचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले. (क्रीडा प्रतिनिधी)>सराव शिबिरामध्ये कठोर मेहनत घेणारे खेळाडूच यशस्वी होतात. आज क्रीडाविश्व पुर्णपणे बदलले असून यामध्ये कारकिर्द घडविण्याची मोठी संधी आहे. यशस्वी खेळाडूंना चांगल्या नोकरीसह अनेक पुरस्कारही पटकावण्याची संधी असल्याने खेळाडूंनी केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करावे. नियमित सराव आणि खेळातील शिस्त पाळली, खेळाडूंचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.- नरसिंग यादव