फ्रान्सचा अल्बानियावर विजय

By Admin | Updated: June 16, 2016 03:20 IST2016-06-16T02:33:31+5:302016-06-16T03:20:49+5:30

यूरो कप फुटबॉल स्पर्धेतील फ्रान्स आणि अल्बानिया यांच्यातील रंगतदार सामन्यात फ्रान्सने अल्बानियावर २-० अशी मात करत विजय मिळविला.

French victory over Albania | फ्रान्सचा अल्बानियावर विजय

फ्रान्सचा अल्बानियावर विजय

>ऑनलाइन लोकमत 
फ्रान्स, दि. १६ -  युरो कप फुटबॉल स्पर्धेतील फ्रान्स आणि अल्बानिया यांच्यातील रंगतदार सामन्यात फ्रान्सने अल्बानियावर २-० अशी मात करत विजय मिळविला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच फ्रान्स आणि अल्बानिया यांच्यातील सामन्यात रंगत निर्माण झाली होती. फ्रान्सला रोखून धरण्याची अल्बानिया संघाने जबरदस्त कामगिरी पार पाडली. मात्र सामन्याच्या शेवटच्या ९० व्या मिनिटाला फ्रान्सच्या अॅटोनी ग्रिझमन याने पहिला गोल करुन आघाडी मिळवून दिली. त्यानंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त पाच मिनिटातील शेवटच्या मिनिटाला पेयेटने दुसरा गोल करून फ्रान्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली. 

Web Title: French victory over Albania