चौथ्या दिवसाचा खेळही वाया

By Admin | Updated: August 22, 2016 04:34 IST2016-08-22T04:34:05+5:302016-08-22T04:34:05+5:30

वेस्ट इंडिज् विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे होऊ शकला नाही.

The fourth day's game wasted | चौथ्या दिवसाचा खेळही वाया

चौथ्या दिवसाचा खेळही वाया


पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडिज् विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे होऊ शकला नाही. पावसामुळे या आधीही दोन दिवसांचा खेळ होऊ शकला नव्हता. तर पहिल्या दिवशी फक्त २२ षटकांचा खेळ झाला होता. भारताचे कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याच्या स्वप्नांवर पावसाने पाणी फेरले आहे. सामन्याचा निकाल न लागल्यास पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर येईल.
भारत आणि वेस्ट इंडिज् यांच्या दरम्यान सुरू असलेला हा सामना भारताने जिंकला असता तर भारताचे कसोटी रॅकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राहिले असते. मात्र सोमवारी सामन्याचा अखेरचा दिवस आहे. आणि वेस्टइंडिज्च्या पहिल्या डावात फक्त दोन गडी बाद झाले आहेत. पोर्ट आॅफ स्पेनमध्ये सलग चार दिवस पावसाचे थैमान कायम राहिले. (वृत्तसंस्था)

Web Title: The fourth day's game wasted