फुटबॉलपटू रोनाल्डिनो थोडक्यात बचावला

By Admin | Updated: January 25, 2016 17:07 IST2016-01-25T17:07:38+5:302016-01-25T17:07:38+5:30

ब्राझिलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डिनो सध्या भारतात आला असून आज सकाळी तो एका अपघातातून थोडक्यात बचावला.

Footballer Ronaldinho briefly escaped | फुटबॉलपटू रोनाल्डिनो थोडक्यात बचावला

फुटबॉलपटू रोनाल्डिनो थोडक्यात बचावला

ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. २५ - ब्राझिलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डिनो सध्या भारतात आला असून आज सकाळी तो एका अपघातातून थोडक्यात बचावला.
कोझीकोडे येथे नागजी फूटबॉल टुर्नांमेन्टच्या उद्धाटनाच्या निमित्ताने रोनाल्डिनो काल (दि.२३) भारतात आला आहे. आज सकाळी रोनाल्डिनो येथील सरकारी शाळेच्या एका कार्यक्रमाला जात असताना रोडवरील चौकात असलेला सिग्नल लाईटचा खांब त्याच्या गाडीच्यासमोर कोसळला. या दुर्घटनेत तो थोडक्यात बचावला. त्यानंतर घटनास्थऴी लगेचच पोलीस दाखल झाले आणि रोडवर पडलेला खांब बाजूला केला. सिग्नल लाईटचा खांब बराच जुना असल्यामुळे मोडकळीस आला होता. तसेच, खांब कोसळल्यानंतर सिग्नल लाईट तुटल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: Footballer Ronaldinho briefly escaped