प्रो कबड्डी लीगचा पहिला सामना मुंबईत

By Admin | Updated: June 18, 2016 20:51 IST2016-06-18T20:51:23+5:302016-06-18T20:51:23+5:30

प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमाला 25 जूनपासून सुरुवात होत असून पहिला सामना पुण्याऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे

First match of the Pro Kabaddi League in Mumbai | प्रो कबड्डी लीगचा पहिला सामना मुंबईत

प्रो कबड्डी लीगचा पहिला सामना मुंबईत

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 18 - प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमाला 25 जूनपासून सुरुवात होत आहे. मुंबईमधील कबड्डी चाहत्यांसाठी खुशखबर असून पहिला सामना मुंबईत खेळवला जाणार आहे. मुंबईमधून प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमाला सुरुवात होत आहे.
 
अगोदर ठरल्याप्रमाणे पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये पहिला सामना होणार होता. मात्र त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सभा होणार असल्याने हा सामना पुण्याऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे. 
 
आयोजकांनी चौथ्या मोसमाची सुरुवात पुण्याऐवजी मुंबईमधून होणार असल्याचं अधिकृत जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे 25 ते 28 जूनदरम्यान होणारे सामने पुण्याऐवजी आता मुंबईच्या वरळीतील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या इनडोर स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.
 

Web Title: First match of the Pro Kabaddi League in Mumbai