शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

फेड एक्सप्रेसची विक्रमी घोडदौड...

By admin | Updated: July 4, 2016 20:40 IST

तब्बल चार वर्षांचा ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा दुष्काळ संपवण्यास प्रयत्नशील असलेला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ४ : तब्बल चार वर्षांचा ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा दुष्काळ संपवण्यास प्रयत्नशील असलेला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. या दिमाखदार कामगिरीसह त्याने दिग्गज व महिला खेळाडू मार्टिना नवरातिलोवाच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. त्याचवेळी दुसरीकडे जपानच्या केई निशिकोरी आणि महिलांमध्ये एग्निस्का रादवांस्का यांचे आव्हान संपुष्टात आले.

सात वेळचा विम्बल्डन चॅम्पियन आणि तृतीय मानांकीत फेडररने अमेरिकेच्या स्टिव्ह जॉनसनचा ६-२, ६-३, ७-५ असा पराभव करुन तब्बल १४व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तसेच यासह फेड एक्सप्रेसने दिग्गज नवरातिलोवाने जिंकलेल्या ३०६ ग्रँडस्लॅम सामने विजयाची बरोबरीही केली. दरम्यान, जपानच्या निशिकोरीला नमवलेल्या क्रोएशियाच्या मारिन सिलिचचे उपांत्यपुर्व फेरीतफेडररपुढे कडवे आव्हान असेल.

पाठीच्या दुखापतीमुळे अंतिम क्षणी सामना सोडलेला निशिकोरी सुरुवातीपासूनच झगडताना दिसला. सिलिचविरुध्द १-६, १-५ असा पिछाडीवर असतानाच त्याने चिकित्सक आणि टे्रनर यांचा सल्ला घेत सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या दुखापतीचा मजबूत फटका निशिकोरीला बसला. यामुळे अवघ्या १० मिनिटातंच सिलिचने ५-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्याचवेळी महिलांमध्येही धक्कादायक निकाल लागला. तिसऱ्या मानांकीत रादवांस्काला स्लोवाकियाच्या १९व्या मानांकीत डॉमनिका चिबुलकोवाने अत्यंत अटीतटीच्या लढतीत ६-३, ५-७, ९-७ असे नमवून खळबळ माजवली. तर आॅस्टे्रलिया ओपन विजेती एंजलिक केरबरने सहजपणे उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश करताना जपानच्या मिसाकी दोइचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले.