शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलो - अनुप कुमार

By admin | Updated: March 7, 2016 03:52 IST

‘हरल्यानंतर काय बोलणार, आमच्याकडून मोक्याच्या वेळी चुका झाल्या. पटना पायरेट्सच्या खेळीचे श्रेय दिले पाहिजे, ते खरंच चांगले खेळले. आम्ही विजेतेपद राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो

रोहित नाईक, मुंबई‘हरल्यानंतर काय बोलणार, आमच्याकडून मोक्याच्या वेळी चुका झाल्या. पटना पायरेट्सच्या खेळीचे श्रेय दिले पाहिजे, ते खरंच चांगले खेळले. आम्ही विजेतेपद राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो,’ या प्रतिक्रियेतूनच यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारची निराशा स्पष्ट दिसून येते. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर अनुपने ‘लोकमत’शी बोलताना आपले मत मांडले.‘अखेरच्या चढाईत माझे नियंत्रण चुकल्याने मी बाद झालो आणि पटनाने एका गुणाची निर्णायक आघाडी घेत बाजी मारली. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला. जर त्या वेळी मी बाद झालो नसतो, तर चित्र नक्की वेगळे दिसले असते,’ असेही अनुपने या वेळी सांगितले. भक्कम बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईकरांची बचाव फळी अंतिम सामन्यात मात्र अपयशी ठरली. पहिली यशस्वी पकड करण्यासाठी यू मुंबाला तब्बल १५व्या मिनिटांपर्यंत वाट पहावी लागली. याबाबत अनुप म्हणाला, ‘काही वेळा नशीब तुम्हाला साथ देत नाही. नेमकी हीच गोष्ट आमच्यासोबत घडली. जेवढ्या पकडी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्या सगळ्या अपयशी ठरल्या. सलग पकडी अपयशी ठरल्या, तर दडपण येतं. त्यामुळेच सुरुवातीला खेळ खालावल्याने सावरायला वेळ लागला. चढाईपटूही बाद होत असल्याने सर्वच आमच्या विरोधात घडत होते. मध्यंतराला आम्ही योग्य नियोजन केल्याने खेळ हळूहळू सुधारला. बरोबरीही साधली, पण शेवटी अपयशी ठरलो.’संपूर्ण स्पर्धेत निर्णायक ठरलेल्या रिशांक देवाडिगाला या सामन्यात सुरुवातीच्या काही चढाईनंतर बाहेर बसवून शब्बीर बापूला खेळविण्यात आले. याबाबत अनुपने सांगितले, ‘रिशांक सुरुवातीला खूप वेळा बाद झाला. डावी बाजू थोडी कमजोर असल्याने, आम्ही त्याला बाहेर बसवून शब्बीरला खेळविण्याचा प्रयोग केला, पण फारसा फरक नाही पडला, तसेच आता यापुढे प्लॅनिंग तर आहेच. मात्र, त्यासाठी खूप वेळ बाकी आहे, पण आता येणाऱ्या मोसमाच्या सुरुवातीलास सर्व प्लॅनिंग सुरू होतील.’