युरो कप - आयर्लंडला २-१ ने नमवून फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: June 26, 2016 22:35 IST2016-06-26T22:35:49+5:302016-06-26T22:35:49+5:30

गोल पिछाडी भरुन काढत यजमान फ्रान्सने आयर्लंडवर २-१ ने विजय मिळवत युरो चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

Euro Cup - Ireland beat France 2-1 in the quarter-finals | युरो कप - आयर्लंडला २-१ ने नमवून फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत

युरो कप - आयर्लंडला २-१ ने नमवून फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत

ऑनलाइन लोकमत 

पॅरिस, दि. २६ - गोल पिछाडी भरुन काढत यजमान फ्रान्सने आयर्लंडवर २-१ ने विजय मिळवत युरो चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. फ्रान्सच्या विजयाचा नायक ठरला अँटोईन ग्रिझमॅन. पहिल्या सत्रात आयर्लंडकडे १-० अशी आघाडी होती. 
 
सामन्याच्या दुस-याच मिनिटाला फ्रान्सचा मध्यरक्षक पॉल पोगबाने पेनल्टी एरियामध्ये केलेल्या चुकीमुळे पंचांनी आयर्लंडला पेन्लटी बहाल केली. ब्राडीने या संधीचा फायदा उचलत आयर्लंड १-० अशी आघाडी मिळवून दिली. ब्राडीने मारलेली जोरदार किक पोलला आपटून गोल जाळयात विसावली. 
 
त्यानंतर ग्रिझमॅनने ५७ व्या आणि ६१ व्या मिनिटाचा चेंडूला गोल जाळयाची दिशा दाखवत फ्रान्सला २-१ असे वर्चस्व मिळवून दिले. फ्रान्सने शेवटपर्यंत ही आघाडी टिकवत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा पुढचा सामना इंग्लंड किंवा आइसलँड यापैकी एकाशी होऊ शकतो. फ्रान्सचे २००० मध्ये युरो चषकाचे विजेतेपद मिळवले होते. 
 

Web Title: Euro Cup - Ireland beat France 2-1 in the quarter-finals