इंग्लंडकडून भारत पराभूत

By Admin | Updated: October 12, 2015 23:52 IST2015-10-12T23:52:49+5:302015-10-12T23:52:49+5:30

गत दोन वेळच्या विजेत्या भारतीय ज्युनिअर हॉकी संघाला पाचव्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत दुसऱ्या लढतीत इंग्लंडकडून ३-४ गोलनी पराभव पत्करावा लागला.

England lose to England | इंग्लंडकडून भारत पराभूत

इंग्लंडकडून भारत पराभूत

जोहर बाहरू (मलेशिया) : गत दोन वेळच्या विजेत्या भारतीय ज्युनिअर हॉकी संघाला पाचव्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत दुसऱ्या लढतीत इंग्लंडकडून ३-४ गोलनी पराभव पत्करावा लागला.
विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याचे लक्ष्य समोर ठेवून या स्पर्धेत खेळत असलेल्या भारतीय संघाने रविवारी चिरप्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. या विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मात्र आपली विजयी लय राखता आली नाही. गत उपविजेत्या संघाने इंग्लंड संघाने या विजयाबरोबरच गेल्या वर्षीचा अंतिम फेरीतील पराभवाचा वचपासुद्धा काढला. इंग्लंड संघाच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ करून भारतावर निर्विवाद वर्चस्व राखले. पहिल्या हाफमध्ये त्यांनी २-३ गोल अशी पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने विश्रांतीनंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सामना शेवटी ४-३ गोलने जिंकला. (वृत्तसंस्था)

Web Title: England lose to England