शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

सायनाचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: June 4, 2016 02:16 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची पदकाची सर्वांत मोठी आशा असलेल्या सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी अव्वल मानांकित कॅरोलिना मारिनकडून

जकार्ता : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची पदकाची सर्वांत मोठी आशा असलेल्या सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी अव्वल मानांकित कॅरोलिना मारिनकडून २२-२४, ११-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे सायनाच्या आॅलिम्पिक तयारीला मोठा धक्का बसला आहे. आठव्या मानांकित सायनाला ४७ मिनिटांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या निकालासह भारताचे स्पर्धेतील अव्हान संपुष्टात आले. सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मारिनविरुद्ध पहिल्या गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ केला; पण हा गेम गमाविल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सायनाने मारिनविरुद्ध सपशेल शरणागती पत्करली. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाची मारिनविरुद्ध कारकिर्दीतील कामगिरी ४-३ अशी झाली आहे. सायना यंदाच्या मोसमात अद्याप जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. इंडोनेशियन ओपनमध्ये मात्र सायनाचे स्वप्न पूर्ण झाले नाही. सायनाला २०१६ मध्ये इंडिया ओपन सुपर सिरीज, मलेशिया सुपर सीरिज, स्विस ओपन ग्रांप्री आणि आशियन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. याव्यतिरिक्त आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये उभय खेळाडूंदरम्यान संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. सायना एकवेळ ७-१३ ने पिछाडीवर होती. त्यानंतर तिने सलग सहा गुण वसूल करीत १६-१३ अशी आघाडी घेतली. सायनाने त्यानंतर १९-१६ अशी आघाडी घेतली होती; पण मारिनने १९-१९ अशी बरोबरी साधली. सायनाकडे २०-१९ आणि २२-२१ अशी दोनदा गेम पॉर्इंटची संधी होती, पण मारिनने सलग तीन गुण वसूल करीत पहिला गेम २४-२२ ने जिंकला. पहिला गेम गमाविल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सायनाला दुसऱ्या गेममध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मारिनने ४-१, ७-३ आणि १७-९ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर २१-११ ने सहज गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. मारिनने या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले असून तेथे तिला चौथे मानांकन प्राप्त चीनची खेळाडू वांग यिहानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.