पाकिस्तानला कमजोर समजू नका - गावस्करांचा सल्ला

By Admin | Updated: February 27, 2016 14:18 IST2016-02-27T14:18:18+5:302016-02-27T14:18:18+5:30

आज भारत व पाकिस्तान आशिया कप 2016 च्या टी - 20 सामन्यात समोरासमोर येत असून सध्या ऐन भरात असलेल्या भारतानं पाकिस्तानला कमजोर समजू नये असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला आहे

Do not underestimate Pakistan - Gavaskar's advice | पाकिस्तानला कमजोर समजू नका - गावस्करांचा सल्ला

पाकिस्तानला कमजोर समजू नका - गावस्करांचा सल्ला

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - आज भारत व पाकिस्तान आशिया कप 2016 च्या टी - 20 सामन्यात समोरासमोर येत असून सध्या ऐन भरात असलेल्या भारतानं पाकिस्तानला कमजोर समजू नये असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्करांनी पाकिस्तानी संघातल्या खूप खेळाडूंनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेतला होता आणि ते भारताचं कडवं आव्हान पेलण्यास  सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.
भारताने आत्तापर्यंत पाच वेळा आशिया कप जिंकला आहे आणि त्यांनी पहिल्याच सामन्यात बांग्लादेशला 45 धावांनी हरवलं असल्यामुळे यंदाही भारत जिंकण्याच्या शक्यता जास्त आहेत. शिखर धवन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात कशी करतात हे महत्त्वाचं असल्याचं गावस्कर यांनी अधोरेखीत केलं आहे. त्यानंतर पाकिस्तानची गाठ विराट कोहलीशी पडणार आहे.
आशिया कपमध्ये आत्तापर्यंत भारत व पाकिस्तान एकमेकांशी 10 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता आघाडी कोण घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Do not underestimate Pakistan - Gavaskar's advice