शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आनंद-नकामुरा लढत अनिर्णीत

By admin | Updated: June 16, 2017 04:00 IST

माजी विश्व चॅम्पियन आनंदने अलीबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नकामुराला बरोबरीत रोखले.

स्टावेंगर : माजी विश्व चॅम्पियन आनंदने अलीबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नकामुराला बरोबरीत रोखले. यापूर्वीच्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर आनंदने पुन्हा एकदा नकामुराविरुद्ध चांगला खेळ केला, पण अमेरिकन बुद्धिबळपटू आनंदच्या आव्हानाला उत्तर देण्यास सज्ज होता. आर्मेनियाच्या लेव्होन आरोनियनने रशियाच्या सर्गेई कार्जाकिनचा पराभव करीत स्पर्धेत आपला तिसरा विजय नोंदवला. या विजयसह तो या स्पर्धेत प्रथमच एकमेव आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला. नेदरलँडच्या अनिस गिरीने फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर लाग्रेव्हाचा पारभव केला. दिवसातील सर्वांत सनसनाटी निकाल म्हणजे मॅग्नस कार्लसनला रशियाच्या व्लादीमीर क्रॅमनिकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल कार्लसनसाठी नुकसानदायक ठरू शकतो. त्याला अव्वल स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे. सातव्या फेरीअखेर आरोनियनने पाच गुणांसह एकमेव आघाडी घेतली आहे. तो स्पर्धेत सुरुवातीला आघाडीवर असलेल्या नकामुरापेक्षा अर्ध्या गुणाने आघाडीवर आहे. क्रॅमनिक व गिरी प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. अमेरिकेचा वेस्ली सो त्याच्यापेक्षा एका गुणाने पिछाडीवर आहे तर आनंद, कार्जाकिन व कारुआना प्रत्येकी तीन-तीन गुणांसह संयुक्तपणे सहाव्या स्थानी आहेत. विश्व चॅम्पियन कार्लसन फ्रान्सच्या वाचियर लाग्रेव्हच्या साथीने अखेरच्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)