शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी क्रिकेट जर्सीवर धोनीचं नाव आणि नंबर

By admin | Updated: December 29, 2016 16:34 IST

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग डे टेस्टदरम्यान पाकिस्तानी चाहता धोनीच्या नावाची जर्सी घालून फिरत होता

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 29 - भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत. जगातल्या प्रसिद्ध क्रिकेटर्समध्ये धोनीदेखील आहे. जगातला असा कोणताच देश नसेल जिथे धोनीचे चाहते सापडणार नाहीत. भारतात धोनीचे करोडो चाहते आहेत, इतकंच कशाला पाकिस्तानमध्येही त्याचे अनेक चाहते आहेत. मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग डे टेस्टदरम्यान असाच पाकिस्तानचा एक चाहता पहायला मिळाला ज्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाची जर्सी घातली होती, पण त्याच्यावर नाव होतं महेंद्रसिंग धोनीचं. 
 
धोनीचा हा चाहता पाकिस्तानची जर्सी घालून फिरत होता. पण त्यावर धोनीचं लिहिलं होतं, एवढंच नाही तर धोनीच्या जर्सीवर असणार सात क्रमांकही त्याच्या जर्सीवर होता. स्टेडिअममधील उपस्थितांची नजर जेव्हा त्याच्यावर पडली तेव्हा सगळ्यांसाठी तो एक चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर सध्या त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. महत्वाचं म्हणजे पठाणकोट आणि उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. 
 
याअगोदरही पाकिस्तानात विराट कोहलीच्या एका चाहत्याला जेलची हवा खावी लागली होतो. आपल्या घरावर तिरंगा फडकावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद अफ्रिदीच्या एका चाहत्याला भारतात अटक झाली होती. 
 
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफदेखील महेंद्रसिंग धोनीचे चाहते आहेत. 2007 मध्ये त्यांनी धोनीच्या लांब केसांची प्रशंसा केली होती. गेल्यावर्षीही त्यांनी धोनी एक चांगला आणि मनोरंजक खेळाडू असल्याचं म्हटलं होतं.