शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

धवन, रोहित, रैनाची बॅट आता तरी चालणार ?

By admin | Updated: March 30, 2016 12:45 IST

धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३०  -  विजयानंतर प्रश्न निर्माण होत नसतात, प्रश्न निर्माण होतात ते पराभवानंतर. सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ जिंकत असल्यामुळे धोनीची संघनिवड आणि रणनितीवर अजूनही कडाडून टीका झालेली नाही. धोनीला विजयी संघ कायम ठेवून खेळायला आवडत असले तरी, त्या संघातील काही खेळाडूंना वारंवार संधी देऊनही ते निष्प्रभ ठरत असतील तर संघामध्ये बदल करायला नको ?. 
 
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयात सांघिक योगदानापेक्षा विराट कोहलीचे योगदान सर्वाधिक आहे. या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून  रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना सातत्याने अपयशी ठरत आहेत. या तिघांना एकाही सामन्यात मोठी आणि विजयाची पायाभरणी करणारी खेळी करता आलेली नाही. 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतका अनुभव गाठीशी असणा-या रोहित शर्माकडून भरपूर अपेक्षा आहेत. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याने आपली विकेट फेकल्याचे दिसले आहे. रोहितने वर्ल्डकपच्या चार सामन्यांमध्ये फक्त ४५ धावा केल्या आहेत. विराट आणि शिखरने एकाही सामन्यात दणदणीत सलामी दिलेली नाही. शिखरने वर्ल्डकपमध्ये फक्त ४३ तर, रैनाने ४१ धावा केल्या आहेत. हे तिघे झटपट बाद होत असल्यामुळे मधल्याफळीतील फलंदाजांवर दबाव वाढत आहे. 
 
विजयी संघ न बदलण्याच्या धोनीच्या  ह्ट्टामुळे एखादा दिवस खराब असेल तर, संघ अडचणीत सापडू शकतो. सुरेश रैनाच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी द्यावी असे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे. धोनीकडे युवराज सारखा चांगला फिरकी गोलंदाज असूनही त्याने त्याचा वापर केला नव्हता. 
 
अखेर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात संधी मिळताच युवराजने आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात कर्णधार स्टीव्हन स्मिथलाच तंबूची वाट दाखवली होती.