देहूची युनायटेडवर एका धावेने मात

By Admin | Updated: June 19, 2015 02:07 IST2015-06-19T02:07:45+5:302015-06-19T02:07:45+5:30

पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित समरलीग क्रिकेट स्पर्धेत देहू स्पोर्ट्स क्लबने राहुल आसबेची (नाबाद १०१) शतकी खेळी

Dehu defeats United at one end | देहूची युनायटेडवर एका धावेने मात

देहूची युनायटेडवर एका धावेने मात

समर लीग क्रिकेट : राहुल आसबेचे शतक
पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित समरलीग क्रिकेट स्पर्धेत देहू स्पोर्ट्स क्लबने राहुल आसबेची (नाबाद १०१) शतकी खेळी व विकास म्हाळुंगकरच्या (४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड डेव्हलपर्सला एका धावेने नमवले.
लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात देहू स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १७२ धावांचे तगडे आव्हान उभारले. राहुल आसबेने ६६ चेंडूत तडाखेबाज शतकी खेळी करीत संघाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. प्रवीण काळोखे (२८) याने त्याला साथ दिली. समीर पटेल याने ३ व शरीफ काझी याने १ बळी घेऊन चांगला मारा केला.
या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या युनायटेड डेव्हलपर्सचा डाव २० षटकांत १७१ धावांत संपुष्टात आला. अब्रार पानसरे (३९), समीर पटेल (३५) यांनी संघाच्या विजयासाठी चांगले प्रयत्न केले. अरिफ इनामदार याने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद १५ धावांची खेळी करीत सामन्यात रंगत भरली. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. विकास म्हाळुंगकर याने ४ बळी घेत युनायटेडचे कंबरडे मोडले.

Web Title: Dehu defeats United at one end